shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रमजान मुबारक २०२३


दिनांक २५-०३-२०२३
वार :- शनिवार, 
रोजा नं. ०२p

*लेखक-डॉ.सलीम सिकंदर शेखरमजान मुबारक २०२३

*बैतुशशिफा हॉस्पिटल, श्रीरामपूर
*मोबा.९२७१६४००१४

*"प्रत्येक शब्दाचं - क्षण-न- क्षणाचं सबाब (पुण्यं) भेटेल " !!

अल्लाहाच्या अलौकिक पर्वाची सुरुवात काल चांदरातच्या बारीकशा चंद्रकोरीने उत्साहमय शुभेच्छांनी अल्लाह (परमेश्वर - ईश्वरा) च्या असिम  कृपेने  मुलांबाळांसह - कुटुंबातील व सर्व नातेवाईकांना शुभ -शुभ  - शुभेच्छा देऊन अल्लाहजवळ (आफीयत) सह निरोगी आयुष्यासाठी दुआ (आशिर्वाद) मागुन त्याबरोबरच आपल्यासह जगातील सर्व लोकांच्या - प्राणीमात्रांच्या त्रासमुक्त- निरोगी  आयुष्यासाठी मनोभावे  दुआ (प्रार्थना) करुनच पुढील फक्त  रमजान मुबारक महिन्यातील अतिविशेष नमाज म्हणून प्रसिद्ध ज्यांस" तराविह" नमाज संबोधतात आशा पवित्र तराविह नमाज च्या तयारीला लागतात.
 दैनंदिन रोजच्या नमाज पढण- (१) फजर - (भोर- पहाटेच्या) ५-३०-ते ६-० वाजता २+२ = ४ रकात, 
 (२) जोहर - दुपारी १२-३० ते २-० वा.४+ ४+ २+२ = १२ रकात,(३), असर -  संध्या ४-० ते ५-३० वा. ४+४=८ रकात.

(४) मगरीब - सुर्यास्तांनंतर लगेच ३+२+२ =७ ), (५) ईशा - रात्री ८-३० ते उशिरा पर्यंत ४+ ४+ २+ २+३ +२ = १७ या दिवसभरातील नमाज व्यतिरिक्त  रात्री उशिराची ईशा नमाज बरोबरच "तराविह " २० रकातसाठी आपआपल्या दिवसभरातील जीवनोपयोगी गरजेचे पुरतत्ता करून, मोलमजुरी करून, कामधंदा आटोपून, मुलांबरोबर हजर होतात.

तराविह नमाजची विशेषत: म्हणजे १-३० ते २-०० तासाभरात दिव्य कुरआन चे  दिड पारा (अध्याय) चे  पठण केले जाते.अल्लाहा (परमेश्वर- ईश्वरा) ने धरतीवर पवित्र जन्नत (स्वर्ग) तुन विशेष दुत हजरत जिब्राईल अलै.मार्फत जगाला एकमेव अदभुत दिव्य कुरआन  रमजान महिन्यातच प्रेषित मुहम्मद स्व. (शांती असो त्यांच्या वर ) यांच्या हाती जगातील समस्त मानव जातीने आपले --"जीवन कसे जगावे ,Way of Life "-- याचे मार्गदर्शन करण्यासाठी एक वरदान,भेटचं दिली.
यामधे जसे जसे काळानुरूप - काळानुसार,विशिष्ट प्रकारच्या गरजेनुसार -प्रमाणे  ६ ६ ६ ६ (सहा हजार सहाशे सहासष्ट ) आयाती (verses, ओव्या ),    ११४ (ऐकशे चौदा) सुराहा ,व ३० (तीस) पारा ( अध्याय) यामधे  विशेषत: कायम वर्तमान- भविष्य काळात व मानवाच्या गरजेनुसार कोणत्याही वेळेस, काळात गेले तरी आणि विशेषतः  हजारोंवेळी -हां हाजोरोंवेळी वाचले तरी रोज नवीनच काही  तरी वाचल्याचे कायम वाटते. कोणत्याही काळात पुरोगामी असे मराठी साहित्यामधे आपण त्याला अलंकार युक्त भाषेत पवित्र कुरआन जगाला २२ (बासीस) वर्षे आपल्या विश्वासू लाडक्या प्रेषित मुहम्मद स्व.यांच्या हातात बहाल केले..
प्रेषित हजरत मुहम्मद स्व. यांनी आपल्या मित्रांना अरबी,उर्दू भाषेत सहाबा (रजि.) म्हणतात. यांच्या मार्फत सर्व जगात पाठवले.आशा पवित्र कुराणचे प्रत्येक नमाजमधे हाफीज -ए-कुरआन किंवा कारी- ए- कुरआन म्हणजे ज्या व्यक्तींना व्याकरणासह अलंकारिक पध्दतीने सात विविध प्रकारच्या पध्दतीने संपूर्ण दिव्य कुराण तोंडपाठ आहेत असे व्यक्ति,  उत्साहमय आनंदमय वातावरणात "तराविह नमाज पढण" करून बांधवांना मंत्रमुक्त करतात.याच भक्तिमय आशा अलौकीक पर्वाची बांधव वर्ष भर आतुरतेने वाट पाहत असतात.
 प्रेषित मुहम्मद स्व.ने म्हटले की," रमजान मधील नमाजचे पुण्यं (सबाब) हे सत्तर (७०) पटीने भेटेल, कुरआनच्या प्रत्येक शब्दाचं - क्षणा क्षणाच  (पुण्यं) सबाब तुम्हाला  नक्कीच भेटेल.' ".
  मग अशा पुण्यं सबाब कमावण्याची संधी कोणं सोडेल...!

close