श्रीरामपूर प्रतिनिधी:
खासदार गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या खोकर येथील गोरक्षनाथ माध्यमिक विद्यालयाच्या सहशिक्षिका कवयित्री संगीता फासाटे /कटारे यांना कोपरगांव येथील मिळालेला आदर्श शिक्षिका पुरस्कार संस्थेतील सेवकांना आणि संस्थेला भूषणावह असल्याचे मत श्रीरामपूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा व साई संस्थानच्या विश्वस्त मा.अनुराधाताई आदिक यांनी व्यक्त केले.
इंदिरानगर येथील कटारे परिवाराच्या नवीन घराच्या भूमिपूजन कार्यक्रमात संगीता फासाटे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करताना अनुराधा आदिक बोलत होत्या. यावेळी संस्थेचे सहसचिव जयंतराव चौधरी,साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये, शिरसगांव सोसायटीचे चेअरमन किशोर पाटील बकाल,स्वरश्री संगीत विद्यालयाच्या संचालिका सौ. उषाताई गाडेकर /गवळी, शिक्षक बॅकेचे माजी चेअरमन श्री. सूर्यकांत डावखर, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री.जाकिर सय्यद, माजी प्राचार्या विमलताई आदिक/पटारे,आर्किटेक्ट श्री.अकबर शेख,अर्बन बँकेचे मरिबा पटेकर,माजी मुख्याध्यापक चंद्रभान फासाटे गुरुजी आदी व्यासपीठावर विराजमान होते.अशोकराव कटारे,संगीता फासाटे व सिध्देश कटारे यांनी सर्वांचे स्वागत केले. संगीता फासाटे आणि अशोकराव कटारे यांचे शैक्षणिक आणि सामाजिक कार्य प्रभावी आहे, कौंटुबिक प्रगती आणि संस्कारशीलता भूषणावह आहे, असे सांगून घराच्या निर्मितीला शुभेच्छा दिल्या. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी 'घर 'कविता सादर केल्यावर सांगितले की,फासाटे आणि कटारे परिवाराने आपल्या परिश्रमाने,बुद्धीने समाजात आदर्श वाटचाल केल्याचे सांगितले.घर म्हणजे देवालय मानले तर भक्ती वाढते आणि अहंकारमुक्त माणूस एकमेकांना जपतो.संगीता फासाटे यांनी साहित्यक्षेत्रात तर अशोकराव कटारे यांनी प्रामाणिकपणे शिक्षणक्षेत्रात नावलौकिक प्राप्त केले असल्याचे ते म्हणाले.
यावेळी जयंतराव चौधरी, सौ. उषाताई गाडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास अनेक शिक्षक व मान्यवर उपस्थित होते.अशोकराव कटारे यांनी आभार मानले.
*सौजन्य: स्वाभिमानी न्यूज नेटवर्क

