डॉ.विनोद मोहितकर संचालक तंत्रशिक्षण विभाग यांनी राज्यातील तंत्रशिक्षण विभागाच्या सहसंचालक यांना दिले आदेश
पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते डॉ.अभिषेक हरिदास व अभिजित खेडकर यांच्या तक्रारींवर धडक कारवाई
प्रतिनिधी : संजय वायकर
पुणे : १४ / सातवा वेतन आयोग राज्यात १/१/१६ पासून लागू झाला व महाराष्ट्र सरकारने याची पूर्वलक्षित अंमल बजावणी सन २०१९ मध्ये केली .
सन २०२१ च्या शासन निर्णयानुसार ज्या प्राचार्यांना सहाव्या वेतन आयोगात १०००० रुपये AGP होता त्यांनाच सातव्या वेतन आयोगा नुसार १०००० AGP म्हणजेच १४ व्या लेव्हल मिळेल
मात्र राज्यातील शासकीय तंत्रनिकेतन पुणे याचे प्राचार्य डॉ.विठ्ठल बांदल यांची नियुक्ती प्राचार्य पदावर ८/७/१६ म्हणजे सातव्या वेतन आयोगात झाली तसेच ते सहाव्या वेतन आयोगात असिस्टंट प्रोफेसर म्हणजे ९००० AGP मध्ये होते त्यामुळे सन २०२१ च्या शासन निर्णया नुसार त्यांना १०००० AGP मिळू शकत नाही तसेच त्यांची लेव्हल १४ नसून १३A1 होती .
मात्र त्या काळातील भ्रस्ट कारभारी सहसंचालक डॉ.दत्तात्रय जाधव व संचालक डॉ .अभय वाघ यांनी प्राचार्यांशी संगनमत करून राज्याच्या संपत्ती वरती डल्ला मारला . डॉ . वाघ यांची नंतर MPSC मध्ये बदली झाली व त्यांच्या जागी डॉ.विनोद मोहितकर सारखा प्रामाणिक अधिकारी संचालक बनला .
डॉ.विनोद मोहितकर संचालक तंत्रशिक्षण यांचे सारखे प्रामाणिक संचालक राज्याला मिळाल्याने राज्यातील घोटाळे नक्कीच थांबतील आणि आमच्या तक्रारी वर गांभीर्याने व प्रामाणिक पणे कारवाई करणाऱ्या डॉ.विनोद मोहितकर साहेबांचे आभार
---डॉ.अभिषेक हरिदास व अभिजित खेडकर

