shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ताहाराबादचे सेवाभावी मा.सरपंच ह भ प पुंडलिक आण्णा महाजन यांना राज्य स्तरीय ज्ञान सिंधु समाज सेवा पुरस्कार २०२३ जाहीर

सामोडे:प्रतिनिधी दिलीप घरटे
 ताहाराबाद तालुका सटाणा जि . नाशिक  येथिल सगर वंशीय जिरे माळी समाज बांधव ताहाराबाद गावाचे मा . सरपंच विविध पदनियुक्त सभासद अध्यक्ष वारकरी सांप्रदायाचे पाईक सेवाव्रती  ह . भ. प . सगर मित्र  गावगाड्याच्या बारा भानगडी गावातल्या गावात मिटवण्याचा प्रयत्न करणारे ' व गावाला वाम मार्गापासून ते तंटा बखेडे कोर्ट कचेरी पर्यंत रोखणारे 'सर्वांनाच हरीनामाची आस लाऊन गुण्या गोविंदाणे नामाची गोडी लावणारे ' संत महंत ह्यांच्या पाऊलावर पाऊल ठेऊण चालायला लावणारे सदा हरीणाम मुखी असणारे  संसारातून परमार्थ साधानारे हिन दिन लिन लाजार बेजार ह्यांच्या अडी अडचणी सोडवणारे भांडण तंटा मिटवणारे गावातच न्याय निवाडा करणारे 'सर्व जाती धर्म पंथाना आपलेसे वाटणारे सेवाभावी नेतृत्व म्हणंजे ह . भ. प . पुंडलिक रामचंद्र महाजन उर्फ पुंडलिक आण्णा यांना त्यांच्या राजकीय सामाजिक अध्यात्मिक वारकरी  सेवा कार्याचा सन्मान म्हणून ज्ञानसिंधु प्रकाशन नाशिक यांनी राज्य स्तरीय ज्ञानसिंधु समाज सेवा २०२३ हा पुरस्कार जाहीर केला असून २१ एप्रिल शुक्रवार रोजी दुपारी ३ : ०० वा . राणीलक्ष्मी बाई भवण अशोक स्तंभ नाशिक येथे ज्ञानवंत प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे ज्ञानसिंधु प्रकाशनाचे तान्हाजी खोडे यांनी आमच्या प्रतिनिधीस सांगितले आहे .
मा . पुंडलिक आण्णा यांचा पुरस्कार सन्मान सोहळा म्हणंजे सगर समाज बांधवां बरोबर बहुजन समाजाचा सन्मान सोहळाच साजरा होणार आहे . ज्ञानसिंधु प्रकाशन नाशिक नेहमीच अशीच तोला मोलाची रत्न हिरकण्या शोधून त्यांना सन्मानित करत असते . ह्या कामी झानसिंधुचे कार्यकारी संपादक लेखक साहेबराव नंदन यांची साथ संगत नेहमीच असते . पुंडलिक रामचंद्र महाजन म्हणंजे सगर समाजाबरोबर इतर समाजाला लाभलेले रत्न आहे . पुंडलिक आण्णासाहेब म्हणंजे वारकरी सांप्रदायाचे चालते बोलते फिरते व्यासपीठ आहे . त्यांना संत परंपरेतील सर्वच साहित्य ज्ञानसंपदा आत्मसाद आहे . भजनाच्या सर्वच चाली त्यांना मुखोद्गत आहेत .

सांप्रदाया बरोबर ते समाजप्रिय राजकीय नेतृत्व तसेच कला क्रिडा रंजन मनोरंजन नाट्य सर्वच क्षेत्रात ते आघाडीवर असतात . म्हणून अणेक वर्षापासून त्यांना गावाने स्विकारले आहे . त्यांच्या ह्या निवडीचे सर्व पंचक्रोशीत कौतूक होत असून सर्वत्र आनंदोत्सव पाहावया मिळत आहे . योग्य निवड योग्य रत्न योग्य गुणवंत  पुरस्कार म्हणून समाज भूषण शिक्षण महर्षी अॅड बापू सो संभाजी पगारे सह सर्व जिल्ह्यातून सर्वच क्षेत्रातून कौतूकासह अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .
close