shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्वातंत्र्यवीर सावरकर ग्रामविकास व सार्वजनिक वाचनालय मैंदाणे चा स्पर्धा परीक्षा नोकरी संदर्भ उन्हाळी वर्ग

सामोडे- मैंदाणे पो.बोधगांव येथील स्वातंत्र्यवीर सावरकर ग्रामविकास व सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने सुशिक्षित बेरोजगार युवक- युवतींसाठी येत्या उन्हाळ्यात स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम वर्ग दिनांक २१ एप्रिल २०२३ पासून ते १५ जुन २०२३ पर्यंत भरणार आहेत.

      या अभ्यासवर्ग प्रवेशा करीता नाव नोंदणी दिनांक ३ एप्रिल ते २० एप्रिल पर्यंत वाचनालयात सुरू असणार आहे तरी युवक व युवतींना या संधीचा लाभ घेऊन आपली नोंदणी लवकरात लवकर करावी असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर ग्रामविकास व सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने करण्यात आले आहे.
   या अभ्यासवर्गाचे विशेष म्हणजे या ग्रंथालयातील ९००० उपलब्ध ग्रंथ संपदा वाचनासाठी उपलब्ध आहे.त्यासोबतच लहाणग्यांसाठी बालसंस्कार वर्ग चालवला जाणार आहे.तसेच विविध स्पर्धा परीक्षा यशस्वीतांचे मार्गदर्शन व्याख्याने वेळापत्रकानुसार होणार आहेत.त्यासोबतच नावीन्यपूर्ण उपक्रमात हस्ताक्षर स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा देखील या कालावधीत प्रवेशीता साठी आयोजित करण्यात येणार आहेत. 
     स्वातंत्र्यवीर सावरकर ग्रामविकास व सार्वजनिक वाचनालय यांना या उन्हाळी वर्गा करीता महात्मा फुले विद्याप्रसारक संस्थेच्या डॉ शामाप्रसाद मुखर्जी माध्यमिक विद्यालय मैंदाणे चा वै.ह भ.प.यशवंत अण्णा पगारे अभ्यासिका हाॅल संस्थेचे अध्यक्ष अॅड संभाजी पगारे व सचिव पुष्पलता पगारे यांनी उपलब्ध करून दिली आहे.

सदर अभ्यास वर्ग दररोज सकाळी ८ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. सदर अभ्यास वर्ग चालवण्यासाठी श्रीमती गितांजली पगारे सीमा चव्हाण , संध्या देवरे या युवतींसोबत दररोज उपस्थित राहून  स्पर्धा परीक्षा ग्रंथ घेवदेव करणार आहेत. तसेच या अभ्यासवर्गास सहकार्य करण्यासाठी बागुल पंडित , राकेश शिंदे ,सचिन पाटील उपलब्ध राहणार आहेत.तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक  राजेंद्र क्षिरसागर, उत्तम चौरे,ग्यानदेव बागुल,पंकज शिंदे,बबलू शिंदे, रमेश तोरवणे, महेंद्र पवार,किरण पवार,काळू पवार,सागर शिंदे सागर तोरवणे,निलेश जाधव, अशोक चौरे यांचे मोलाचे सहकार्य लाभणार आहे.तरी युवक-युवतींनी लवकरात लवकर  निःशुल्क नावनोंदणी करून या उन्हाळी अभ्यास वर्गाचा लाभ घ्यावा असे आवाहन  सचिव मिलिंद महाजन यांनी केले आहे.
close