रणसिंग महाविद्यालयातील प्रा.रविराज शिंदे सेवानिवृत्त
इंदापूर प्रतिनिधी :कळंब ता. इंदापूर येथील विश्वासराव रणसिंग कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख लेखक प्रा. रविराज दादू शिंदे यांचा सेवापुर्ती कार्यक्रम महाविद्यालयात संपन्न झाला. त्यांनी रणसिंग महाविद्यालयात ३३ वर्षे प्राध्यापक पदी कार्यरत राहून विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले. संस्था सचिव विरसिंह रणसिंग यांच्या हस्ते प्रा. रविराज शिंदे ,पत्नी लता व मुलगा अभिजीत मुलगी श्वेता यांचा संस्था व महाविद्यालय यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी सेवाकाळात संस्था व महाविद्यालय यांनी कुटूंबातील सदस्याप्रमाणे आपुलकी ची व सन्मानची वागणूक दिली असल्याचे शिंदे यांनी सांगितले. महाविद्यालयीन सहकारी प्राध्यापक यांनी शिंदे यांच्या सेवाकाळातील आठवणीतली गोष्टीना उजाळा दिला. संस्था सचिव विरसिंह रणसिंग यांनी संस्था व महाविद्यालय यांच्यामध्ये कौटुंबिक नाते निर्माण झाल्याने प्राध्यापक कर्मचारी व संस्था नेहमी यशस्वीपणे वाटचाल करीत असल्याचे सांगितले. यावेळी प्राचार्य डॉ अंकुश आहेर , उपप्राचार्य डॉ . अरुण कांबळे, प्राध्यापक डॉ. विलास बुवा, प्रा ज्ञानेश्वर गुळीग , प्रा . राजेंद्रकुमार डांगे,प्रा डॉ. सुहास भैरट ,प्रा डॉ विजय केसकर यांनी शिंदे यांच्या सेवाकाळमधील सहवासाबद्दल आठवणी व्यक्त केल्या.
याप्रसंगी प्राचार्य डॉ.अंकुश आहेर ,उपप्राचार्य डॉक्टर अरुण कांबळे,प्रा.डॉ.रामचंद्र पाखरे,डॉ.विजय केसकर, प्रा.डॉ. विलास बुवा,प्रा.डॉ.सुहास भैरट,प्रा.प्रशांत शिंदे, प्रा.ज्योत्स्ना गायकवाड ,प्रा.राजेंद्रकुमार डांगे,प्रा.विनायक शिंदे ,प्रा.ज्ञानेश्वर गुळीग , डॉ दादा मनेरे ,प्रा. गणेश ठोंबरे, प्रा.अभिजीत शिंगाडे,प्रा ऱवि गायकवाड ,डॉ. बबन साळवे ,प्रा. नम्रता सपकळ, प्रा. महादेव माळवे,प्रा. कपिल कांबळे, प्रा. विद्या गुळीग ,प्रा. काजल रणवरे , प्रा . मयुरी पाटील, प्रा . सुजाता पाटील, प्रा. सुमेधा रणसिंग ,प्रा आकाश झगडे , कार्यालय अधीक्षक अमोल चव्हाण, लिपीक सुशांत रणवरे , दादा जळक ,कर्मचारी दादा ढोपे ,सुभाष भंडलकर,मनोहर भादेकर, संतोष जाधव,संदीप सूर्यवंशी, इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

