रणसिंग महाविद्यालयातील प्रा. प्रशांत शिंदे यांना पीएच.डी. प्रदान
इंदापूर प्रतिनिधी :कळंब येथील विश्वासराव रणसिंग महाविद्यालयातील इंग्रजी चे अध्यापक प्रा.प्रशांत शिंदे यांना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचे पीएच.डी. पदवी प्राप्त झाली आहे. संस्था सचिव विरसिंह रणसिंग यांच्या हस्ते शिंदे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शिंदे यांना पी एच डी पदवी प्राप्त झाल्याबद्दल शिंदे यांचे अभिनंदन करण्यात आले. यांनी पीएच.डी.साठी आर्थर सी. क्लार्क यांच्या कादंबरीतील कल्पनारम्य घटक : एक अभ्यास इंग्रजी प्रबंध सादर केला. सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय, मुरगुड चे प्रा. डॉ. अद्वैत जोशी यांनी मार्गदर्शन केले. शिंदे अनेक वर्षांपासून रणसिंग महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे अध्यापन करीत असून, महाविद्यालयीन आय क्यु एस सी विभाग प्रमुख म्हणून महाविद्यालयीन जबाबदारी संभाळत आहेत. सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक कार्यात त्यांचा सहभाग असतो.इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष आनंदी रणसिंग ,उपाध्यक्ष प्रकाश कदम, सचिव वीरसिंह रणसिंग, खजिनदार हनमंतराव रणसिंग, विश्वस्त कुलदीप हेगडे, विश्वस्त शिवाजीराव रणवरे ,विश्वस्त वीरबाला पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अंकुश आहेर ,उपप्राचार्य डॉ.अरुण कांबळे आदींनी अभिनंदन केले.
याप्रसंगी प्राचार्य डॉ.अंकुश आहेर ,उपप्राचार्य डॉक्टर अरुण कांबळे, विकास रणसिंग, प्रा.डॉ.रामचंद्र पाखरे,डॉ.विजय केसकर, प्रा.डॉ. विलास बुवा,प्रा.डॉ.सुहास भैरट,प्रा.प्रशांत शिंदे, प्रा.ज्योत्स्ना गायकवाड ,प्रा.राजेंद्रकुमार डांगे,प्रा.विनायक शिंदे ,प्रा.ज्ञानेश्वर गुळीग , डॉ दादा मनेरे ,प्रा. गणेश ठोंबरे, प्रा.अभिजीत शिंगाडे,प्रा ऱवि गायकवाड ,डॉ. बबन साळवे ,प्रा. नम्रता सपकळ, प्रा. महादेव माळवे,प्रा. कपिल कांबळे, प्रा. विद्या गुळीग ,प्रा. काजल रणवरे , प्रा . मयुरी पाटील, प्रा . सुजाता पाटील, प्रा. सुमेधा रणसिंग ,प्रा आकाश झगडे , कार्यालय अधीक्षक अमोल चव्हाण, लिपीक सुशांत रणवरे , दादा जळक ,कर्मचारी दादा ढोपे ,सुभाष भंडलकर,मनोहर भादेकर, संतोष जाधव,संदीप सूर्यवंशी, इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

