shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निमसाखर येथे श्रीराम नवमी उत्साहात साजरी.

निमसाखर येथे श्रीराम नवमी उत्साहात साजरी.

इंदापूर प्रतिनिधी:   निमसाखर (ता.इंदापुर ) रामनवमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम व  श्री राम यांच्या प्रतिमेची भव्य अशी मिरवणूक काढत रामनवमी साजरी करण्यात आली.
जुनी चावडी येथील विठ्ठल मंदिरामध्ये प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे सुरुवातीला पूजन करत सकाळपासून भजनाचा कार्यक्रम झाला. दुपारी बारा वाजता नवमीनिमित्त श्री रामाचा जयघोष करीत रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवासाठी निमसाखर व परिसरांमधून मोठ्या प्रमाणावर भाविक उपस्थित होते. यानंतर भाविकांना प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. 
            सायंकाळी सहाच्या सुमारास श्रीरामाची प्रतिमा असलेली पालखी चे पूजन वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर परिसरातील मान्यवर व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही पालखी जुनी चावडी , पवार गल्ली , निमसाखर बस स्थानक सह अन्य भागातून पुढे जुने चावडी जवळ हा पालखी सोहळा संपन्न झाला.
close