शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन )
सामाजिक बातमी
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स , श्री साईबाबा सेवा संस्थान शिर्डी तसेच अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अँड.डॉ.विक्रांत वाघचौरे यांना विधी क्षेत्रात, धार्मिक , सांस्कृतिक तसेच सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले,
यावेळी आंतरराष्ट्रीय मानवधिकार असोसीएट्स संस्थेच्या दक्षिण भारतच्या महिला कार्याध्यक्ष सौ गीता शेट्टी मॅडम , महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेचे विभागीय अध्यक्ष श्री रवींद्र कर्पे साहेब, भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे राहता तालुकाध्यक्ष श्री स्वानंद रासने श्री साईनाथ शेट्टी आणि सहकारी उपस्थित होते.

