श्री स्वामी समर्थ पालखी चे दि. ८ एप्रिल रोजी श्रीरामपूरात आगमन
शौकतभाई शेख
श्रीरामपूर - दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री. स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट,अक्कलकोट आयोजित श्री स्वामी समर्थ महाराज पालखी पादुका यात्रा परिक्रमा वर्ष - २७ वे चे अक्कलकोट येथून प्रस्थान झालेल्या पालखीचे शनिवार दि. ८ एप्रिल २०२३ रोजी दुपारी १२.०० वाजता श्रीरामपूर शहरामध्ये आगमन होत आहे.
सदरील पालखी कोल्हारहून बाभळेश्वर मार्ग सुतगिरणी रस्त्याने संजयनगर येथील दत्तांबा देवस्थान मंदिरात येणार आहे. तद्नंतर दुपारी १२.०० वाजता पालखी व्यापारी मंगल कार्यालय, श्रीरामपूर येथे येणार आहे. पालखी आल्यानंतर महाआरती होणार असून पालखी चे फक्त दु. १२ ते ४ या वेळेतच दर्शन घेता येईल. ४ नंतर पालखी वैजापूरला रवाना होणार आहे,तरी सर्व स्वामी भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वामी समर्थ सेवा ट्रस्टचे सर्व ट्रस्टी, स्वामी भक्त सेवेकरी यांनी केले आहे.

