shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

' चिमणी ' कवितेने नगरचा इतिहास घडविला ; महाजन यांना द्वितीय नामांकन जाहिर


चिमणी ' कवितेने नगरचा इतिहास घडविला ;       महाजन यांना द्वितीय नामांकन जाहिर
नगर : २ /  अहमदनगरचे लोकप्रिय कवी संजयजी महाजन यांच्या  ' चिमणी ' या कवितेस पूणे येथील स्पर्धेत द्वितीय नामांकन मिळाले असून नुकताच त्यांना ऑनलाईन पुरस्कार घोषित करण्यात आला आहे .

१६ मार्च २०२३ रोजी जागतिक चिमणी दिनानिमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती . त्याचा ऑनलाईन निकाल ३१  मार्च रोजी जाहिर करण्यात आला असुन यात महाजन यांना द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला असुन त्यांना लवकर पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात येणार आहे.

ही स्पर्धा प्रायोजक म्हणून संत गाडगे महाराज विचारमंच महाराष्ट्र राज्य ओतूर, पुणे, शांतिकमल फौंडेशन सांगली,व कवी सरकार इंगळी सार्वजनिक वाचनालय हातकणंगले यांचे मार्फत सदर काव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली. त्यांनी संयुक्त विद्यमाने घेतलेल्या राज्यस्तरीय द्वितीय पुरस्काराने  अहमदनगरचे लोकप्रिय कवी संजयजी महाजन यांच्या 'चिमणी ' या कवितेला सन्मानित करण्यात आले आहे . अहमरनगरच्या इतिहासात आणखी एक यशस्वी मानाचा तुरा लागला आहे .

या पुरस्कारामुळे कवी संजयजी महाजन यांच्यावर सर्व स्तरातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे .

close