प्रतिनिधी : सुनिल ससाणे
देडगाव बालाजी : २४ / मागील वर्षी सप्टेंबर ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नेवासा तालुक्यातील तसेच देडगाव बालाजी येथील शेतकर्यांचा खरीप व रब्बी हंगाम वाया गेला. राज्य सरकार ने अशा बाधित शेतकर्याच्या पिकांचे पंचनामे केले .
त्यानुसार तालुक्यात आठ पैकी तीन महसूल मंडळात भरपाई जाहीर झाली मात्र पाच महसूल मंडळातील शेतकरी यापासून वंचित राहिले अशा वंचित शेतकर्यांना भरपाई मिळावी.
व बालाजी देडगाव येथील शेतकर्याचे 269 पोटखराबा क्षेत्र लागवडी खाली येण्यासाठी महसूल मंत्री व जिल्हयाचे पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष आकाश चेडे पोलिस मित्र समाजिक संस्था अध्यक्ष शहादेव मुंगसे पोपट बनसोडे मिनीनाथ मुंगसे आकाश हिवाळे आदी मान्यवर उपस्थित होते

