शिवसेनेच्या पुणे जिल्हा प्रवक्तेपदी राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेले वसंतराव आरडे यांची निवड,
कालठण नंबर १ या ठिकाणी श्री स्वामी समर्थांचे ६ वे केंद्र संपन्न
इंदापूर प्रतिनिधी: अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर अंतर्गत श्री स्वामी समर्थ प पू गुरुमाऊली व चंद्रकांत दादा यांच्या कृपा अाशीर्वादाने व सतीश दादा मोटे तसेच इंदापूर केंद्रातील प्रमुख सेवेकरी प्रदिप भगत यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुका ग्रामविकास अभियान अंतर्गत तालुक्यातील कालठण नंबर १ या ठिकाणी प्रचार प्रसार सेवा व श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी सोहळा संपन्न झाला. यावेळी कर्मयोगी सह साखर कारखान्याचे संचालक हनुमंत जाधव यांचे हस्ते अारती संपन्न झाली.
केंद्र कालठण नं १ येथील विठ्ठल रुक्मीणी मंदीर येथे स्थापना करण्यात आले. दर रविवारी संध्याकाळी ६:३० वाजता साप्ताहिक आरतीचे नियोजन करण्यात आले. श्री काळ भैरवनाथ मंदिरातून स्वामी समर्थाच्या पालखी ची मिरवणूक संपूर्ण गावातून भजन करत मिरवण्यात अाली. यावेळी महिलांनी दारात रांगोळ्या काढून स्वागत केले व पालखीची पुजा केली .यावेळी काकासाहेब मांढरे, नितीन दीक्षित, राणी क्षीरसागर, प्राची चिंचकर, रामदास जगताप सर, अरविंद जगताप, भारत शिंदे सर, राजेंद्र चिंचकर, देविवास पाटिल, माजी सरपंच रविंद्र कदम, शहाजी कदम, संतोष सपकळ, तानाजी सपकळ, हरिदास शेंडगे, उत्तम सपकळ, प्रसाद पाटील, महादेव पाटिल, वसंत पाटील, अरुण कुंभार, बबलू क्षीरसागर तसेच पुरुष व महिला साधक मोठया प्रमाणात उपस्थित होते .
इंदापूर: राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेले व एकेकाळी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते म्हणून समजले जाणारे वसंतराव आरडे यांची संघटनात्मक गुण ओळखून शिवसेनेने त्यांना पुणे जिल्ह्याचे प्रवक्ते पदी निवड केली आहे. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी वसंतराव आरडे यांच्या अनुभवाची दखल घेऊन जिल्हाप्रमुख यांना पुणे जिल्हा प्रवक्ते पदी नेमण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार आज बारामती येथे जिल्हाप्रमुख सुरेंद्र देवरे यांनी वसंतराव आरडे यांना जिल्हा प्रवक्ते पदी निवड झाल्याचे पत्र दिले .वसंतराव आरडे हे गेल्या २५ वर्षापासून राजकारणात सक्रिय सहभाग. पूर्वी त्यांच्या कामाची दखल घेऊन राष्ट्रवादीने त्यांची पुणे जिल्हासरचिटणीस पदी निवड केली होती.आपल्या निवडीच्या प्रक्रियेनंतर नवनियुक्त जिल्हा प्रवक्ते वसंतराव आरडे म्हणाले की,”मी येणाऱ्या काळात पुणे जिल्ह्यात शिवसेना घरोघरी पोहोचवण्याचे काम करीन व खा.राहुलजी शेवाळे मुंबई व माजी राज्यमंत्री शिवतारे बापू यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वाढवणार आहे, वसंतराव आरडे यांचा प्रदीर्घ अनुभव आणि पक्षाकडून मिळणारी साथ यामुळे येणाऱ्या काळात शिवसेना मजबूत होणार, आसे मत वसंतराव आरडे म्हणाले. त्याच बरोबर निवड झाल्याबद्दल वसंतराव आरडे यांचा सन्मान करण्यात आला ,इंदापूर तालुका प्रमुख महारुद्र पाटील,अशोकराव घोगरे,शिवाजीराव ईजगुडे, किसनराव जावळे, किरण गोफणे, सुभाष जगताप, शशिकांत तरंगे, तुकाराम करे, दुर्वास शेवाळे,आप्पा माने,बबनराव खराडे, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते,

