shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कळाशी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करीत सोलापूर पोलीस सेवेत भरती झालेल्या प्रज्ञा सौदागर शिंदे हिचा सत्कार....

कळाशी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करीत सोलापूर पोलीस सेवेत भरती झालेल्या प्रज्ञा सौदागर शिंदे हिचा सत्कार....
h
इंदापूर प्रतिनिधी :(ता.14)
  भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे फक्त जयंती पुरते मर्यादित न राहता सर्वांनी आत्मसात करून त्याप्रमाणे आचरण करावे असे प्रतिपादन कळाशी ग्रामपंचायतीच्या सरपंच रूपाली राजेंद्र गोलांडे यांनी केले.
     इंदापूर तालुक्यातील कळाशी येथील बौद्ध विहार येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सरपंच रूपाली राजेंद्र गोलांडे व उपसरपंच लतिका नवनाथ करे यांचे हस्ते भगवान गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुप्रिया बबन करे, अपेक्षा पंजाबराव शिंदे, अंकुश जनार्दन शिंदे  विजय रेडके,धनंजय चव्हाण यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते. 
   यावेळी नुकत्याच झालेल्या पोलिस भरती मध्ये  सोलापूर शहर पोलीस पदी नियुक्ती झाल्याबद्दल काळाशी गावची कन्या प्रज्ञा सौदागर शिंदे हिचे सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. 
-
close