दत्तात्रय भरणे आमदार व्हावे म्हणून पडस्थळच्या
कार्यकर्त्याने भरणे यांच्या वजना इतकी पेढे तुला करून फेडला नवस
पडस्थळच्या कोटलिंग नाथाला केला होता रामभाऊ मारकड यांनी नवस.
कार्यकर्त्याच्या अशाप्रकारच्या प्रेमाने आमदार दत्तात्रय भरणे गेले अतिशय भारावून .
इंदापूर प्रतिनिधी: माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. श्री.भरणे यांचा स्वभाव, राजकारणाची पध्दत आणि त्यांचा साधेपणा हा अगदी लहान मुलांपासून ते अबाल वृध्दांपर्यंत सर्वांनाच भावतो आहे.याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा पडस्थळ गावामध्ये आला आहे.याचे झालं असं की २०१९ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान आमदार दत्तात्रय भरणे यांना विरोध करत राष्ट्रवादी काँग्रेस मधील अनेक नेते बाहेर पडले होते.त्यामुळे दत्तात्रय भरणे एकटे पडले होते.परंतु सामान्य कार्यकर्ता आणि गाव-गावातील गोरगरिब जनता मात्र दत्तात्रय भरणे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी होती.अशा संकटाच्या काळात आपल्या लाडक्या नेत्याला पुन्हा आमदार करण्यासाठी सामान्य कार्यकर्ते जीव ओतून लढत होते.तर गावा-गावातील वडीलधारी मंडळी आमदार भरणे आमदार व्हावेत म्हणून नवस करत होती.असाच नवस पडस्थळमधील रामभाऊ मारकड यांनी केला होता.पडस्थळ गावातील श्री.कोटलिंगनाथ देवस्थान नवसाला पावणारे म्हणून उजनी बॅकवॉटर परिसरात परिचीत आहे.त्यामुळे आपला लाडका नेता पुन्हा आमदार व्हावा या भावनेने रामभाऊ मारकड यांनी श्री. कोटलिंगनाथ चरणी नवस केला होता.इकडे अनेक अडचणींवर मात करत दत्तात्रय भरणे यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला तर दुसरीकडे रामभाऊ मारकड यांच्या सारख्या अनेक सामान्य माणसांची श्रध्दा खरी ठरली होती.परंतु लागलीच कोरोना महामारीमुळे तब्बल दोन वर्ष मंदिरे,यात्रा-उत्सवांवर निर्बंध असल्याने इच्छा असूनही रामभाऊ मारकड यांना नवस पुर्ण करता आला नाही.
परंतु यंदाच्या वर्षी त्यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांना बोलावून त्यांच्या वजनाइतके म्हणजे तब्ब्ल ८९ किलोंची पेढेतुला करून अखेर नवस पुर्ण केला.यावेळी आमदार भरणे यांच्याबरोबर रामभाऊ मारकड,पांडूरंग मारकड,बापूआण्णा रेडके,विष्णू रेडके,संदिपान मारकड परशुराम रेडके,विलास मारकड,भारत मारकड,महेंद्र रेडके,अरूण झिटे,दत्ता रेडके,आरूण मारकड विशाल मारकड,हनुमंत रेडके,जितेंद्र मारकड,नवनाथ मारकड यांच्यासह गावकरी उपस्थित होते.
एकूणच सामान्य कार्यकर्त्याच्या अशाप्रकारच्या प्रेमाने मात्र आमदार दत्तात्रय भरणे अतिशय भारावून गेले होते.यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावील निखळ हास्य नेता व कार्यकर्त्यामधील निस्सिम प्रेमाची साक्ष देत होते.

