श्रीरामपूर प्रतिनिधी:
चर्मकार विकास संघ (श्रीरामपूर) यांचेकडून विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
चर्मकार विकास संघ पदाधिकारी तथा विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी चर्मकार विकास संघ श्रीरामपूर तालुका अध्यक्ष चांगदेव देवराय,उपाध्यक्ष रवींद्र गाडेकर, शहर अध्यक्ष कर्णासाहेब कापसे, शहर उपाध्यक्ष रमेश चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब कांबळे, वधुवर परिचय मेळावा अध्यक्ष सुरेश भोसले,संघटक संतोष देवराय, गटाई कामगार शहर अध्यक्ष सुरेश बोरुडे, खजिनदार सुनील सोनवणे, विठ्ठल कापसे, अशोक अहिरे , नामदेव अनुष्ठान, रामदास सोनवणे, किशोर पिंगळे, ज्ञानेश्वर जाधव, ओंकार अनुष्ठान,बंडु तुपे आदि पदाधिकाऱ्यांसमवेत परिसरातील नागरिक उपस्थित होते.
वृत्तसंकलन: समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर

