shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निमसाखर गावचे सुपुत्र आबा रणवरे यांच्यावर पुरस्कारांचा वर्षाव.

निमसाखर गावचे सुपुत्र आबा रणवरे यांच्यावर पुरस्कारांचा वर्षाव. 

समता सन्मान पुरस्कार, राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार,सामाजिक जनजागृती पुरस्कार या तीन पुरस्कारांनी आबा रणवरे यांना केले सन्मानित.

इंदापूर प्रतिनिधी:  एखादी व्यक्ती अंधारात असूनही सतत जेव्हा सातत्याने चांगलं काम करण्याचा विडा उचलते तेव्हा ती व्यक्ती वेगवेगळ्या संस्था आणि प्रसार माध्यमांना  प्रकाशझोतात आणण्याचे काम करायला भाग पाडते .  यापैकीच एक व्यक्तिमत्व म्हणजे निमसाखर गावचे सुपुत्र व सध्या मुंबई येथील जुईनगर येथे राहणारे आबा रणवरे होय . 
 नवी मुंबई येथील जुईनगर येथे राहणारे आबा रणवरे हे त्यांच्याकडे  असलेले उत्कृष्ट ज्ञान व त्याचा वापर गरजू रुग्णांवर कसा करता येईल त्यावर भर देत समाजाची आतापर्यंत खूप सेवा करत आले आहेत तसेच विविध ठिकाणी पर्यावरणाची संवर्धन आणि संरक्षण करण्यामध्ये ही त्यांचा खूप मोठा  वाटा आहे. 
त्यांना आतापर्यंतही खूप वेगवेगळ्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मोठमोठ्या नामांकित हस्तीनी त्यांना वेळोवेळी सन्मानित केले आहे.   नुकतेच त्यांना १ एप्रिल २०२३ रोजी अध्यक्ष.  ऍड. चंद्रकांत निकम यांच्या हस्ते त्यांच्या समता सामाजिक संस्था, नेरूळ, नवी मुंबई या संस्थेतर्फे 'समता सन्मान पुरस्कार' प्राप्त झाला.  हा कार्यक्रम दारावे, नवी मुंबई येथे पार पाडला. यावेळी डॉ. कैलास जवादे आणि डॉ. गोविंद जवादे  तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून विशेष महाराष्ट्र २०२१ याशिका ढोले उपस्थित होते. अनेक मान्यवर आणि मोठ्या  जनसंख्येत हा सोहळा पार पडला.

 तसेच ८ एप्रिल २०२३ रोजी भागीरथी  भोईर सामाजिक प्रतिष्ठान ,देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग, अध्यक्ष दिनेश भोईर आणि भाजप आमदार. ऍड. श्री.  अजित  गोगटे  यांच्या विशेष उपस्थितीत राज्यस्तरीय ' समाजरत्न ' पुरस्कार देण्यात आला. 
तसेच ११ एप्रिल २०२३ रोजी मानव सेवा बहुद्देशीय संस्था ,एरंडोल ,जिल्हा. जळगाव येथे दैनिक लोकमत वृत्तपत्राच्या नामांकित पत्रकारांपैकी एक  एस. बी. चौधरी सर यांच्या हस्ते ' सामाजिक/ जनजागृती पुरस्कार ' देऊन आबा रणवरे यांना गौरविण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विकी खोकरे आणि  विधीतज्ञ मोहन शुक्ला आणि अनेक मान्यवर  उपस्थित होते. मोठ्या जनसंख्येत हे कार्यक्रम पार पडले.
close