shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कौठळी शाळेत नवागतांचे स्वागत व शाळापूर्व तयारी मेळावा उत्साहात पार..

कौठळी शाळेत नवागतांचे स्वागत व शाळापूर्व तयारी मेळावा उत्साहात पार..

शाळापूर्व तयारी मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागण्यास मदत होऊन गुणवत्ता व पट वाढणार.
इंदापूर प्रतिनिधी: दिनांक २९/४/२०२३ रोजी जि.प.प्राथमिक शाळा कौठळी येथे शाळापूर्व तयारी मेळावा उत्साहात पार पडला.प्रथम दाखलपात्र विद्यार्थ्यांची वाजतगाजत प्रभातफेरी काढण्यात आली.इयत्ता ४ थी मधील अभिजित मोहिते याने वाद्यकाम केले.नंतर मुलांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले.नंतर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य,पालक,मातापालक यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.नंदकुमार सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले.दाखलपात्र मुलांना दाखल करून घेतले.नंतर त्या सर्व मुलांची आयडिया कार्ड भरून घेण्यात आली.त्यामध्ये विद्यार्थी नाव,कौटुंबिक माहिती,वजन,उंची,शारीरिक विकास,भावनिक विकास,गणनपूर्व तयारी तपासण्यात आली.शेवटी सर्व पालकांना सूचना देऊन समुपदेशन करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपक्रमशील शिक्षिका आरती गायकवाड यांनी केले तर आभार भारत ननवरे यांनी मानले.या मेळाव्यास शाळा व्य समिती चे अध्यक्ष,सदस्य, माता ,पालक,ग्रामस्थ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे कौतुक पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अजिंक्य खरात साहेब,विस्ताराधिकारी सुनिल मुगळे साहेब, केंद्रप्रमुख संभाजी आजबे साहेब,विषयतज्ञ विश्वजित करे व ग्रामस्थ कौठळी यांनी केले.*
close