श्री शिवाजी विद्यालय सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित बावडाची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न .
इंदापूर प्रतिनिधी: श्री शिवाजी विद्यालय सेवक सहकारी पतसंस्थेची सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २७ एप्रिल २०२३ रोजी श्री शिवाजी विद्यालय बावडा येथे सर्व सभासदांच्या उपस्थितीत अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
यावेळी सर्व संचालक मंडळ व सभासद सहकार्यांनी उपस्थित राहून संस्थेच्या कामकाजात आत्मीयतेने भाग घेऊन मुद्देसूद विचार मांडले. सर्व सभा खेळीमेळीने होऊन सर्व निर्णय एकमताने घेण्यात आले. यावेळी कर्जाचा व्याजदर साडेनऊ ते दहा टक्के ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला व डिव्हिडन वाटण्याचा निर्णय घेण्यात आला.
श्री शिवाजी विद्यालय सेवक सहकारी पतसंस्थेस माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील , श्री. शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे संचालक उदयसिंह पाटील,उपाध्यक्ष मनोज पाटील, सचिव किरण पाटील व संचालक मंडळ यांचे वेळोवेळी सहकार्य लाभले आहे. सचिव डी .बी. घोगरे सर यांनी सर्व अहवालाचे वाचन केले व सभासदांच्या सर्व शंकेचे अतिशय चातुर्याने निरसन केले.
यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र रणमोडे सर यांनी अध्यक्षीय भाषण केले. अध्यक्षीय भाषणामध्ये पतसंस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य घोगरे सर , कर्मयोगीचे प्राचार्य घोरपडे सर, हनुमान विद्यालयाचे प्राचार्य कोकाटे सर , लोकनेते शहाजीराव पाटील विद्यालयाचे प्राचार्य आवारे सर ,कै.लोकनेते शहाजीराजे पाटील माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सुळे सर व सर्व सभासद व संचालक मंडळ उपस्थित होते.
सर्व सभासदांना शेवटी मिठाईचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आभार उपाध्यक्ष दिलीप सातपुते सर यांनी मानले.

