राहुरीच्या 'मुळा' चा नाशिक 'जलसंपदा'त झेंडा..!!
शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
शुक्रवार दिनांक २८ एप्रिल २०२३
कार्यकारी अभियंता सायली पाटील, उपविभागिय अभियंता शरद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुळा पाटबंधारे विभागाचे यश..!!
राहुरी : नाशिक जलसंपदा विभागांतर्गत मुळा पाटबंधारे विभागाने सर्वाधिक वसुलीचा विक्रम प्रस्थापित करीत विभागात सर्वाधिक बक्षिसे मिळविली. मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील, उपविभागिय अभियंता शरद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुळा पाटबंधारे विभागाने हे यश संपादित केले.
नाशिक जलसंपदा विभागाअंतर्गत सिंचन, बिगर सिंचन वसुली उद्दीष्टपूर्ती झालेले तसेच दप्तर कामकाजात सुसुत्रता राखत उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा व गुणगौरव समारंभ नाशिक अंतर्गत लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाकडून गंगापूर धरणाजवळ, बोट क्लब एमटीडिसी नाशिक येथे साजरा झाला. मुख्य अभियंता पी. बी. मिसाळ, अधिक्षक अभियंता सागर शिंदे यांच्या हस्ते अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन २०२२-२३ या वर्षामध्ये गुणगौरव करण्यात आला.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

