इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १४ जागांसाठी ३४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात तर ४ जागा बिनविरोध.
दोन पॅनलचे प्रत्येकी १४ उमेदवारासह अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात .
१४ जागांसाठी २८ एप्रिल रोजी होणार मतदार.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागली असून १८ जागांपैकी ४ जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर १४ जागांसाठी दोन पॅनेल व काही अपक्ष मिळून तब्बल ३४ उमेदवार रिंगणात आहेत. गुरुवारी २० एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि यामध्ये ३४ उमेदवार रिंगणात राहिल्याने अनेक दिवस बिनविरोध साठी सुरू असलेले प्रयत्न निष्फळ ठरुन इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही दुरंगी झाली आहे. त्यामुळे आता चुरस वाढणार असून बाजार समितीवर नेमकी कोण सत्ता स्थापन करणार याकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे.
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी १५७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.यामध्ये छाननी प्रक्रियेमध्ये ११ अर्ज बाद झाले तर १०८ उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली.चार उमेदवार बिनविरोध होऊन ३४ उमेदवार रिंगणात आहेत.अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जे पी गावडे यांनी दिली.
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती साठी शेतकरी विकास पॅनेल मधून १८ जागांसाठी निवडणूक लढवली जात असून त्यापैकी चार जागा बिनविरोध झाले आहेत तर १४ जागांसाठी निवडणूक उमेदवार रिंगणात आहेत. भाऊसाहेब तुकाराम सपकळ हे पॅनेल प्रमुख असून कांतिलाल शिवाजी झगडे हे प्रचार प्रमुख आहेत.
तर स्वाभिमानी शेतकरी पॅनेल मधून १४ उमेदवार देण्यात आले असून पॅनेल प्रमुख धनगर ऐक्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.शशिकांत तरंगे असून शिवसेना शिंदे गट तालुकाप्रमुख महारुद्र पाटील आणि अशोक घोगरे हे प्रचार प्रमुख आहेत.
कृषि पतसंस्था सर्वसाधारण एकूण जागा ७
स्वाभिमानी शेतकरी पॅनेलचे उमेदवार : १) जाचक उल्हास वसंतराव २) निंबाळकर तानाजीराव कृष्णराव ३) सरक संपत भिमराव ४) घोळवे विलास पंढरीनाथ ५) घोगरे अशोक शंकरराव ६) पाटील महारुद्र शिवदास
७) जगताप सुभाष अर्जून १) इजगुडे शिवाजी सत्यवान (अपक्ष)
शेतकरी विकास पॅनेलचे उमेदवार : १) माने विलास सर्जेराव २) मोहोळकर रोहित वसंत ३) निंबाळकर संग्राम सिंह दत्तात्रय ४) फडतरे दत्तात्रय सखाराम ५) जगदाळे आप्पासाहेब नानासाहेब ६) पाटील संदीप चित्तरंजन ७) ढुके मनोहर मोहिपती
कृषि पतसंस्था सर्वसाधारण महिला एकूण जागा २
स्वाभिमानी शेतकरी पॅनेलचे उमेदवार : १)कोळेकर सुप्रिया कैलास २) पवार नर्मदा विलास
शेतकरी विकास पॅनेलचे उमेदवार : १) वाबळे रुपाली संतोष २) झगडे मंगल गणेशकुमार
अपक्ष उमेदवार :१) इजगुडे संध्या शिवाजी,२)देवकर संध्या विष्णू
कृषि पतसंस्था इतर मागास प्रवर्ग जागा १
१) भोंग देविदास तात्याबा (स्वाभिमानी शेतकरी पॅनेल)
२) जाधव तुषार देवराज (शेतकरी विकास पॅनेल)
कृषि पतसंस्था भटक्या विमुक्त प्रवर्ग: एकूण जागा २
१) चितळकर बाळासो सोपान (स्वाभिमानी शेतकरी पॅनेल)
२) देवकाते आबा गणपत (शेतकरी विकास पॅनेल)
३) इजगुडे शिवाजी सत्यवान ( अपक्ष)
ग्रामपंचायत सर्वसाधारण : एकूण जागा २
स्वाभिमानी शेतकरी पॅनेलचे उमेदवार : १) थोरात धोंडिबा माणिक २) गायकवाड सुभाष किसन
शेतकरी विकास पॅनेलचे उमेदवार : १) भरणे मधुकर विठोबा २) गायकवाड संतोष नामदेव
अपक्ष उमेदवार : १)जाचक उल्हासराव वसंतराव २)भोंग तानाजी लहुदास
ग्रामपंचायत अर्थिक दृष्ट्या दुर्बल
१) नरुटे तानाजी नवनाथ (स्वाभिमानी शेतकरी पॅनेल)
२) बागल अनिल बबन (शेतकरी विकास पॅनेल)
बिनविरोध झालेले उमेदवार :
१) ग्रामपंचत अनुसुचित जाती-जमाती : माने यशवंत विठ्ठल
२)हमाल व तोलारी मतदार संघ : दिवसे सुभाष ज्ञानदेव
३) व्यापारी व आडते मतदार संघ : पोळ दशरथ नंदु आणि बोरा रौनक किरण
वरील चारही उमेदवार शेतकरी विकास पॅनेल मधून बिनविरोध झाले आहेत.

