डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमसेना तरुण व्यायाम मंडळ वडापुरी यांच्या वतीने इफ्तार पार्टीच्या आयोजन.
भीमसेना तरुण व्यायाम मंडळ वडापुरी यांचा इफ्तार पार्टीचा अनोखा उपक्रम
इंदापूर प्रतिनिधी: वडापुरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त भिमसेना तरुण व्यायाम मंडळ वडापुरी यांच्या वतीने दिनांक २० एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी रमजान महिन्याचे औचित्य सादर मुस्लिम बांधवांना इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
भिमसेना व्यायाम मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने या इतर पार्टी चे विशेष आयोजन अतिशय चांगल्या पद्धतीने केल्याचे दिसून आले. या इफ्तार पार्टीमध्ये भीमसेना व्यायाम मंडळाचे कार्यकर्ते व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. भीमसेना व्यायाम मंडळाच्या या अनोख्या उपक्रमाच्या आयोजनाने वडापुरी येथील मुस्लिम बांधवांनी त्यांचे कौतुक केले.

