भांडगाव येथे जय मल्हार क्रांती संघटनेच्या शाखेचे उद्घाटन.
फोटो: जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांची घोड्यावर मिरवणूक काढून स्वागत करताना.
इंदापूर प्रतिनिधी: भांडगाव (ता. इंदापूर )येथे जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांच्या हस्ते जय मल्हार क्रांती संघटनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन जय मल्हार मित्र मंडळ भांडगाव यांनी केले. यावेळी दौलतनाना शितोळे यांची घोड्यावरून मिरवणूक काढून स्वागत केले.
संघटना मजबूत करण्यासाठी प्रत्येक गावात घोंगडी बैठका व गाव तेथे शाखा स्थापन करण्यात आली.
संस्थापक अध्यक्ष दौलतनाना शितोळे उद्घाटनाप्रसंगी म्हणाले, रामोशी, बेडर, बेरड राज्यातील सर्व समाजासाठी स्वतंत्र राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाला कायमस्वरूपी मंजुरी देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून विधिमंडळात मिळाली. समाजाचा आर्थिक बजेट योजनेतून तळागाळातील सर्व समाजाला महामंडळाच्या शासकीय सर्व योजना, कर्ज पुरवठा व महिला बचत गट यांना आर्थिक सहाय्य, विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांचा ,लाभ मिळवून देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहणार.
प्रास्ताविक भाषणांमध्ये युवा नेते दत्तात्रय जाधव यांनी समाजातील सर्वे कशा पद्धतीने केला त्या विषयी माहिती दिली. समाजातील अडीअडचणी संदर्भात मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष अंकुश जाधव, युवराज जाधव, सरपंच पांडुरंग जाधव, सोमनाथ चव्हाण, सिद्धेश्वर जाधव, कल्याण भंडलकर, सतीश चव्हाण, आत्माराम जाधव, सुभाष गायकवाड, अंकुश गायकवाड, ज्ञानदेव जाधव, सुधीर नाईक व इतर मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय जाधव यांनी केले तर आभार सरपंच पांडुरंग जाधव यांनी मानले.

