shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ग्रामीण भागातील मुलेही चित्रपटसृष्टीत यशस्वी होऊ शकतात,आणि ते ऋषी काळेने करून दाखवले - अनिताताई खरात.

ग्रामीण भागातील मुलेही चित्रपटसृष्टीत यशस्वी होऊ शकतात,आणि ते ऋषी काळेने करून दाखवले - अनिताताई खरात.

चित्रपट अभिनेता ऋषी काळे याचा तेजपृथ्वी ग्रुप कडून पेढे भरऊन सन्मान.
इंदापूर प्रतिनिधी: राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव कऱ्हाडे यांच्या T D M या मराठी चित्रपटासाठी इंदापूर मधील ऋषी विलास काळे याची सहाय्यक अभिनेता म्हणून निवड झाल्याबद्दल,आज इंदापूर येथे तेजपृथ्वी ग्रुप कडून ऋषीचा सन्मान करण्यात आला.
यावेळी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अनिताताई खरात म्हणाल्या की, ऋषीने इंदापूर सारख्या ग्रामीण भागातून अतिशय खडतर परिस्थितीतून आपल्या कलेच्या जोरावर आज पर्यंत वेगवेगळ्या मालिकांमध्ये गाजलेल्या गाडी घुंगराची या गाण्यांमध्ये व इतर चित्रपटात  काम करून आपल्या कलागुणांना वाव दिला, त्यामुळेच त्याला राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली याचा अर्थ ग्रामीण भागातील मुलेही चित्रपटसृष्टीत यशस्वी होऊ शकतात,आणि ते ऋषीने करून दाखवले, त्याचा आदर्श इतर मुलांनीही घ्यावा फक्त नोकरीच्या मागे न लागता मुलांनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करून आपल्या कुटुंबाचे गावाचे नाव उज्वल करावे ,ऋषीने ग्रामीण भागातील मुलांना चित्रपट क्षेत्राविषयी मार्गदर्शन करावे . त्याला व त्याच्या टीमला पुढील वाटचालीस तेजपृथ्वी ग्रुप कडून मनःपूर्वक शुभेच्छा. 
या सन्मानावेळी नानासाहेब खरात , राहुल गुंडेकर,संदीप रेडके,गणेश शिंगाडे, निलेश कवितके, शांतीलाल भगत, व इतर मान्यवर उपस्थित होते.
close