*वडार समाज संघटनेच्या वतीने श्रीकांत मुद्दे यांचे मुख्यमंञी साहेबांना जाहीर पञ..
लातूर / प्रतिनिधी
_________________________________
*महाराष्ट्रातील सर्व मा.आमदार आणि सर्व जिल्हाधिकारी कार्यालयास वडार समाज संघ, महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने श्रीकांत मुद्दे यांचे कामगार दिनाच्या पूर्व संध्येला जाहीर पञ...*
________________________________
*पञास कारण की,*
महोदय,
विकासाचे परिमाण समजले जाणारे रस्ते, धरणे, कालवे, हेमाडपंथी मंदिरे बांधण्यामध्ये वडार समाजाचा महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा असतानाही आजही ग्रामीण भागातला वडार समाज विकासापासून कोसो दूर आहे जिथे जिथे ग्रामीण भागात वडार समाज वास्तव्यास आहे. त्या त्या ठिकाणी सातत्याने ग्राम पातळीवर जीवन जगत असताना त्रास होतो आहे. तेव्हा तुम्हीच सांगा साहेब आम्ही जगावे कसे? गावात पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून घरोघरी नळ योजना केलेली असते, मात्र गावातील वडारवस्तीमध्ये वर्षानुवर्ष ना नळ, ना पाण्याची व्यवस्था असते. त्यामुळे सातत्याने वडार वस्तीतील लोकांना पाण्याअभावी लांब वरून पायी चालत जाऊन पाणी आणावे लागते. का होऊ शकत नाही गावातील सरपंचाकडून वडार वस्तीत नळ योजना तुम्हीच सांगा साहेब, आम्ही जगावे कसे?
गावात रस्त्यांची व्यवस्था केलेली असते. मात्र गावातीलच वडार वस्तीत अजूनही रस्तेच नाहीत भर पावसाळ्यात चिखलातून वाट काढत जगावे लागते. प्रशासनाला सांगूनही आमचे कुणी ऐकत नाही गावात ज्यांना पाच-दहा एकर शेती असते आणि तरीही त्यांचे नाव दारिद्र्यरेषेखालील यादीत असते. मात्र आम्हाला ना शेती ना जमीन तरीही आमचे नाव दारिद्र्यरेषेखालील यादीत नसते. असले तरी गावातीलच खोडकर माणसांमार्फत दारिद्र्यरेषेखालील यादीतून आमचे नाव वगळलेले असते, कारण आम्हाला शासकीय योजना मिळू नयेत म्हणून, वर्षानुवर्षे घरकुलाची स्वप्न हे स्वप्नच राहून जातात. तेव्हा तुम्हीच सांगा साहेब, आम्ही जगावे कसे?
भारताला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्षे उलटून गेली नुकतंच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवही आपण मोठ्या उत्साहाने साजरा केला, परंतु आम्ही याच देशाचे नागरिक असूनही आणि या देशाच्या विकासात आमचा मोलाचा वाटा असूनही आमचे आजही बहुतांशी मूलभूत प्रश्नही सुटत नाहीत याला काय म्हणावे साहेब, तेव्हा तुम्हीच सांगा आता आम्ही जगावे कसे? गावात कुठेतरी थोडीशी जमीन घेतलेली असते जमीन मालकाला पूर्ण पैसे देऊनही वर्षानुवर्षे तो आमच्या नावावर जमीन करून देत नाही काही ना काही कारण देत टाळाटाळ करण्यातच १०-१५ वर्षे घालवतो आहे, तेव्हा त्या जागेवर गावातीलच सरपंच, माजी सरपंचाचा आमच्या जागेवर कब्जा करून आम्हालाच त्याचा त्रास होतो आहे. कधी अश्लील शिवीगाळ तर कधी जीवे मारण्याची धमकी अशा त्रासातून आम्ही जगायचे तरी कसे? तुम्हीच सांगा साहेब आम्ही जगायचे तरी कसे काही काही गावात तर दोनच जाती वास्तव्यास आहेत. वर्षानुवर्षे आणि तरीही आम्हाला निवडणुकीमध्ये प्रतिनिधित्व दिले जात नाही. वर्षानुवर्षे एकाच जातीचे वर्चस्व राहावे म्हणून आम्हाला निवडणुकीत उभे राहूच दिले जात नाही. एक तर आमचा वापर निवडणुकीपुरताच केला जातो आणि निवडणुका संपल्या की आमच्या प्रश्नांकडे सांगूनही दुर्लक्ष केला जातो. आता तुम्हीच सांगा साहेब आम्ही जगावे कसे? ग्रामीण भागात वडार समाजाची कामगार म्हणून संख्या मोठ्या प्रमाणात असूनही बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी ग्रामसेवक सही आणि शिक्काच देत नाही, त्याच्या उद्धट वागण्याचा ञासच होतो आम्हाला, त्यामुळे वडार समाज कामगार असूनही ग्रामसेवकाच्या उदासिनतेमुळे कामगार म्हणून आमची मोठ्या प्रमाणात नोंदणीच झाली नाही म्हणून म्हणतो आम्ही तुम्हीच सांगा साहेब आम्ही जगावे कसे? सांगण्यासारखे इतरही अनेक प्रश्न आहेत तूर्तास आमचे एवढे प्रश्न तरी सोडवाल का साहेब? कराल ना चौकशी आमच्यासाठी सोडवाल का आमचे प्रश्न साहेब? आमच्यासाठी एवढे कराच आपल्या कार्यालय मार्फत ग्रामीण भागातील जे गावे येतात त्या गावातील वडार वस्तीत ज्या मूलभूत सोयी सुविधा नाहीत त्याची चौकशी करून आम्हाला या नळ योजना, रस्ते, पाणी व्यवस्था मिळवून द्या ग्रामीण भागात स्थानिक सरपंच माजी सरपंच यांना सांगून या योजना मिळवून देण्यासाठी आदेश काढाच एवढीच विनंती आहे, तुम्हाला साहेब. या पत्रातून जाहीर विनंती तुम्हाला होता होईल तेवढे लवकर आमचे प्रश्न सोडवाच ही विनंती.
आपला विश्वासू
श्रीकांत मुद्दे,लातूर
मो.9823360226

