रांजणगाव:-
राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सांमत आज रांजणगाव गणपती औद्योगिक वसाहतीत आढावा घेण्यासाठी आले असता त्यांना राज्यातील औद्योगिक वसाहतीत गेल्या ३० वर्षापासून कंत्राटी पद्धतीने काम करत असलेल्या कामगारांना कायम करण्यासंदर्भात निवेदन देऊन सर्व कामगारांना कायम करण्यात विनंती केली असता मंत्री महोदयांनी ८८ कामगारांना कायम केले. उर्वरित कामगारांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले.
यावेळी मा.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भाऊ ताठे, कामगार मोर्चा महाराष्ट्र सरचिटणीस हनुमंत लांडगे कामगार मोर्चा नेते नानासाहेब शिंदे कामगार मोर्चा पश्चिम महाराष्ट्र प्रभारी तुळशीदासदादा दुंडे, अल्पसंख्याक मोर्चा कार्यकारिणी सदस्य दिलावर शेख, कामगार आघाडी कार्यकारिणी सदस्य मयूर गावडे उपस्थित होते.

