उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, अहमदनगर
"मोटार वाहन निरीक्षकांचा माहे एप्रिल २०२३
या महिन्यातील तालुकानिहाय दौरा जाहीर"
रमेश जेठे (सर)
अहमदनगर - उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, अहमदनगर येथील मोटार वाहन निरीक्षकांचा माहे एप्रिल २०२३ महिन्यातील तालुकानिहाय कार्यक्रम जाहीर करण्यात आला असुन तो पुढील प्रमाणे राहील.
दि. ११ एप्रिल रोजी पारनेर, १३ रोजी कर्जत, १८ रोजी पाथर्डी, १९ रोजी जामखेड, २० रोजी शेवगाव, २५ रोजी श्रीगोंदा तर २६ एप्रिल २०२३ रोजी टाकळी ढोकेश्वर येथे दौरा आयोजित करण्यात आला आहे.
ज्या दिनांकाच्या दिवशी सुट्टी जाहीर होईल अथवा प्रशासकीय कारणास्तव दौरा रद्द झाल्यास त्या दिवसाच्या मासिक दौऱ्याचे कामकाज दुसऱ्या सोईस्कर दिवशी होईल व त्याची तारीख त्यावेळी जाहीर करण्यात येईल. अर्जदारांची अपूर्ण कागदपत्रे कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वीकारली जाणार नाहीत. कँपचे सर्व कामकाजासाठी शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरणे बंधनकारक राहील. दौऱ्याच्या ठिकाणी परराज्यातून आलेली वाहने तसेच बसेसची तपासणी केली जाणार नाही. ज्या तालुक्यात कँप आयोजित करण्यात आला आहे त्या तालुक्यातीलच नागरिकांचे कँपमध्ये कामकाज करण्यात येईल. कँप कामकाजाच्या ठिकाणी तपासणी होणाऱ्या सर्व नवीन तात्पुरती नोंदणी झालेल्या परिवहनेत्तर संवर्गातील वाहनांचे डिस्कलेमर असल्याशिवाय वाहनांची तपासणी करण्यात येणार नसल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी,अहमदनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
वृत्तसंकलन :स्वाभिमानी न्युज नेटवर्क,महाराष्ट्र

