शिर्डी
शिर्डी येथील श्रीरामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना येथील भोजनालयासमोर भरलेल्या याञेत एका फिरत्या रहाट पाळण्याचा अपघात झाल्याची घटना घडली आहे.
याञेतील पाळणा तुटल्याने शिर्डी येथील चार जणांना गंभीर दुखापत झाली असुन त्यांना तात्काळ सुपरस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील किशोर साळवे व ज्योती साळवे यांच्या पायांना गंभीर दुखापत झाली असुन भुमिका साबळे हीच्या डोक्याला इजा झाली तर प्रवीण अल्हाट या घटनेत जखमी झाला आहे.या घटनेत साळवे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असुन डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी बाहेर हलवण्यात येणार असल्याची माहिती दिली.
ही घटना समजताच श्री.साईबाबा सुपरस्पेशालीटी रुग्णालयात शिर्डीतील रामनवमी उत्सव कमिटीच्या सर्व सदस्यांनी धाव घेऊन जखमींची विचारपुस केली.यावेळी अभय शेळके , कमलाकर कोते,निलेश कोते , ताराचंद कोते, नितीन कोते , जग्गनाथ गोंदकर , अजय नागरे , संजय शिंदे आदीसह ग्रामस्थांनी रुग्णालयात भेट देऊन रुग्णांची चौकशी केली.तर याच दरम्यान सुरु असलेला श्री रामनवमी उत्सवानिमित्त नृत्य लावण्याचा कार्यक्रम या घटनेमुळे आवरता घेऊन माणुसकीचे दर्शन घडवत या घटनेचे दुख व्यक्त केले.
ही घटना समजताच शिर्डी शहरातील याञेतील नादुरुस्त पाळणे हे या अपघातास कारणीभूत ठरत असुन या घटनेची चौकशी होऊन दोषीवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.तर यातील दोन जखमींना अती गंभीर इजा झाल्याने त्यांच्या उपचाराचा आर्थिक खर्च या कुटुंबाला मिळावा अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.
वृतसंकलन: स्वाभिमानी न्यूज नेटवर्क

