प्रतिनिधी: अफजलखान पुणे
पुणे - येथील येरवडा लक्ष्मीनगर येथील रहिवासी हाजी बनेमिया मोहम्मद शेख यांचे दिनांक १६ एप्रिल २०२३ रोजी रात्री १० वाजता दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले,मृत्यू समयी त्यांचे वय ८५ वर्षाचे होते, त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नात, नातू, पाच मुली, जावई, नातवंडे, असा मोठा परिवार आहे.
राजनीति समाचार वृत्तपत्र न्यूज पोर्टल व न्यूज चॅनल चे संपादक शेख बरकतअली यांचे ते व्याही होते तर ख्वाजा बनेमियां शेख इलेक्ट्रिशियन व सामाजिक कार्यकर्ते यांचे ते वडील होते,हाजी बनेमिया हे सरळ स्वभावाचे व धार्मिक प्रवृत्तीचे होते, त्यांनी आयुष्यभर सहकार्याची भूमिका ठेवून गोरगरिबांना मदतीचा हात पुढे केला आहे, येरवडा, लक्ष्मीनगर परिसरात ते सर्वांशी सुपरिचित होते.
साधारण परिस्थिती असताना त्यांनी आपले उद्योग, व्यवसाय करून नमाज व कुराण पठण करणे याला आपले कर्तव्य जाणून पूर्ण आयुष्य त्यांनी नमाज व कुराण पठण केले, एक धार्मिक प्रवृत्तीची व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे आदराने पाहिले जात असत, त्यांच्या निधनामुळे लक्ष्मीनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे, अल्लाह त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व त्यांना जन्नतमध्ये स्थान मिळो अशी महाराष्ट्र लघु वृत्तपत्र पत्रकार संघ आणि राजनीति समाचार उद्योग समूह व परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजलीअर्पण करण्यात आली.

