कु.श्रृती रसाळ - मुंबई
रंगसंगती, प्रकल्प, प्रतिकृती,तक्ते शैक्षणिक साधने (teaching aids) सोप्या पद्धतीने ,झटपट कसे बनवावे याची कार्यशाळा मुंबईच्या चर्चगेट येथील पी. व्ही.डी.टी.बीएड विभागात द्वारकानाथ भोसले यांच्या मार्गदर्शनाने पार पडली. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होवून ,विषयाचे जास्तीत जास्त आकलन व्हावे याकरीता विविध तंत्रे अध्यापनाची पी.व्ही. डी.टी. एसएनडीटी शिक्षणशास्त्र विभागात बीएड विद्यार्थिनींना म्हणजेच भावी शिक्षिकांना कायमच शिकवले जाते. अध्यापनात सर्जनशीलता, नावीन्य यावे यासाठी विभाग कायमच प्रयत्नशील असते.
विविध किल्ले, व्याकरणिक तक्ते, जलचक्र ,ग्रह ताऱ्यांचे ज्ञान असे वेगवेगळ्या शैक्षणिक विषयानुसार शैक्षणिक साधने पुठ्ठे,खोके ,दोऱ्या, कार्ड पेपर च्या सहाय्याने कसे बनवावे यांचे तंत्र विद्यार्थीनी या कार्यशाळेत शिकल्या व त्यांनी विविध साधने बनवून ती आत्मविश्वासाने सादर केली .प्राध्यापक डॉ.अमोल उबाळे यांनी कार्यशाळेचे प्रस्ताविक केले व प्राध्यापकांनी मार्गदर्शनपर भाषण केले.ही कार्यशाळा म्हणजे अविस्मरणीय अनुभव होता अश्या भावना विद्यार्थिनींनी व्यक्त केल्या.
प्रा.डॉ. करण राठोड, प्रा. प्रवीण काळे, प्रा.डॉ.राकेश रामराजे व प्रिन्सिपल डॉ. सुभाष वाघमारे हे यावेळी उपस्थित होते.जे कायमच विद्यार्थिनींना प्रोत्साहन करतात.विद्यार्थ्यीनींना केवळ विद्यार्थी न समजता आपली स्वतःची आपत्य आणि उद्याचे देशाचे भविष्य या हेतूने मोठ्या संमंजसपणाने ते शिकवतात यामुळे विद्यार्थ्यीनींना ज्ञान अवगत करण्यास क्षणाचा विलंब लागत नाही.हे या महाविद्यालयाचे वैशिष्ट्ये आहे.

