shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडापुरीतील कु. शितल बंडू कोकरे यांनी पुणे ग्रामीण पोलीस भरतीत महिलामध्ये द्वितीय क्रमांकाने मिळवले यश.

वडापुरीतील कु. शितल बंडू कोकरे यांनी पुणे ग्रामीण पोलीस भरतीत महिलामध्ये  द्वितीय क्रमांकाने मिळवले  यश.

 इंदापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे  सत्कार करून केले अभिनंदन.
इंदापूर प्रतिनिधी :
वडापुरी( रामवाडी) येथील कुमारी शितल बंडू कोकरे या मुलीने पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती मैदानी चाचणी व लेखी परीक्षा झालेल्या उमेदवारांची एकत्रित प्रसिद्ध गुणांची यादी मध्ये प्रथम महिला यशस्वी उमेदवारांमध्ये द्वितीय क्रमांकाने व एनटी- सी मधून प्रथम क्रमांकाचे यश मिळवल्याबद्दल इंदापूर शासकीय विश्रामगृह येथे फेटा, हार, पुष्पगुच्छ व पेढा भरून समाज बांधवांकडून कौतुक करीत शुभेच्छा देण्यात आल्या.
 यावेळी रासपचे पुणे जिल्हा अध्यक्ष किरण गोपने, खाटीक समाज संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष विजय इंगोले, सरडेवाडी गावचे सरपंच सिताराम जानकर,नरसिंहपुर चे सरपंच नितीन सरवदे, सामाजिक कार्यकर्ते आप्पासो माने,भाजपा युवा मोर्चाचे बापू पारेकर, सागर रायकर,  अतुल पिसे व इतर मान्यवर उपस्थित होते.

 यावेळी किरण गोपने यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले की, शितल कोकरे या मुलीने नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीमध्ये पुणे जिल्ह्यात पहिल्या दोन महिलांमध्ये यश मिळवण्याचे काम तिने केलेले आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आज शासकीय नोकऱ्यांच्या प्रमाण पाहिलं तर जी नोकरी लागेल ती स्वीकारली पाहिजे. ते स्वीकारून आपला अभ्यास पुढे चालू ठेवला पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये स्पर्धा परीक्षेत यश संपादन करावे असे मत व्यक्त करीत राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने व माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांच्या वतीने किरण गोपने यांनी  शुभेच्छा दिल्या.

 तसेच आप्पासो माने यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले की, कष्टातून आणि परिश्रमातून जे काही मिळवल आहे त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. वडील स्वर्गवासी झाले असून आईच्या पाठबळाने आई वडील आणि आमच्यासारख्या नातेवाईक यांची स्वप्न पूर्ण करण्याचे काम तिने केले आहे. त्याबद्दल मनापासून  अभिनंदन. आई, भाऊ व तिने त्रास सहन करून जिद्दीनं आपण काहीतरी केलं पाहिजे या उमेदीने  हे यश मिळवलं.तुझ्या कष्टाने हे यश मिळवलं आहे.ते खरं कौतुकास्पद आहे.
 तर आभार पुणे जिल्हा अध्यक्ष खाटीक समाज संघटनेचे विजय इंगोले यांनी मानले.
close