ग्रामस्थांनी मानले आ. नमिता मुंदडा यांचे आभार..
प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी:-
केज तालुक्यातील प्रसिध्दी कुंबेफळ येथील गणपती मंदिर देवस्थानाच्या विकासासाठी आ. नमिता मुंदडा यांनी पाठपुरावा करून १ कोटी ९९ लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात यश मिळविले आहे.यानिमित्ताने कुंभेफळ पंचक्रोशीतील जनतेची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याने भाविक भक्तांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
केज तालुक्यातील नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असलेल्या व जागृत देवस्थान अशी ख्याती असल्येल्या कुंभेफळ येथील गणपती मंदिरात दर्शनासाठी भाविकांची सतत वर्दळ असते.मात्र भाविकांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत सुविधा अपुऱ्या होत्या. या देवस्थानाचा विकास करावा अशी मागणी भाविक आणि ग्रामस्थांमधून सातत्याने केली जाता होती.केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी या मागणीची दखल घेत शासनाकडे देवस्थानच्या विकासासाठी पाठपुरावा सुरु ठेवला होता.अखेर आ. मुंदडा यांच्या प्रयत्नांना यश आले असून शासनाने गणपती मंदिर देवस्थानाच्या विकासासाठी १ कोटी ९७ लाखांचा निधी मंजूर केला आहे. यातून सभामंडप, पेव्हरब्लॉक,पिण्याच्या पाण्याची सोय,भक्तनिवास सभा मंडप आदी कामे केली जाणार आहेत.यामुळे अनेक वर्षांची मागणी पूर्ण होत असल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
यानिमित्ताने देवस्थानच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन,भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकाजाताई मुंडे, खा.प्रीतमताई मुंडे यांचे आ.नमिता मुंदडा यांनी आभार मानले आहेत. तसेच या कामासाठी वेळोवेळी पाठपुरावा करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा व युवा नेते अक्षय मुंदडा यांचे कुंभेफळ ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.

