shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साईभक्तांसाठी योग्य त्या रेल्वे संदर्भातील सुविधा देण्यासाठी केंद्रस्तरावरून पाठपुरावा करणार – डॉ.राजेंद्र फडके

शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
 राजकीय बातमी 

 केंद्रीय रेल्वे यात्री सुविधा व सल्लागार समितीचे डॉ.राजेंद्र फडके,कैलास वर्मा,गिरीश राजभोर, के रवींद्रन आदींच्या केंद्रीय समितीने शिर्डी येथील साईनगर रेल्वे स्टेशनला भेट देऊन स्टेशनवरील सेवा सुविधांची पाहणी करून सूचना केल्या. याप्रसंगी डॉ.राजेंद्र फडके यांनी सांगितले कि,शिर्डी हे जागतिक कीर्तीचे तीर्थक्षेत्र असून येथे येणाऱ्या साई भक्तांसाठी योग्य सुविधांचा केंद्र स्तरावरून योग्य पाठपुरावा करू असे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी शिर्डीचे मा. नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी वंदे भारत मुबई वरून जशी सकाळी निघते तशी शिर्डीतूनही निघावी असे निवेदन दिले,यावेळी डॉ.फडके यांनी यासाठी आपण प्रयत्न करू असे सांगितले. 

यावेळी भाजपा शहराध्यक्ष सचिन शिंदे, युवा मोर्चाचे जिल्हा सचिव गणेश जाधव,नरेश सुराणा ,अल्पसंख्याक मोर्चाचे कार्यकारणी सदस्य शब्बीर सय्यद, भाजपा जिल्हा कोषाध्यक्ष रमेश बिडये,वनवासी कल्याण आश्रमाचे सचिन सोमवंशी, रविंद्र सोनवणे आदिंसह रेल्वेचे अधिकारी व कर्मचारी  उपस्थित होते, सदर समितीचे वतीने स्टेशनवरील विविध समस्यांची पाहणी करून त्या जाणून घेतल्या, यावेळी उपस्थित स्थानिक भाजपा पदाधिकारी व शिर्डी ग्रामस्थ यांनी स्टेशनवर विविध सेवा सुविधांच्या सुधारणेबाबत संबंधीत समितीचे निदर्शनास आणून देऊन त्यावर सुधारणा करावयास विनंती केली. 

यावेळी साईनगर रेल्वे स्टेशनचे स्टेशन प्रबंधक ऐ. के. शुक्ला,रेल्वे पोलीस फोर्सचे एस.पी. सिंग,मनोज सिसोदिया,ऐ .के.यादव,रेल्वे पोलीस निरीक्षक प्रविण पारखे, जनसंपर्क अधिकारी अनिल तायडे,हर्षित बिष्णोई,पवन कुमार,आदी अधिकारी वर्गासह रेल्वेचे कर्मचारी ऊपस्थित होते, यानंतर साईबाबा मंदिरात जाऊन साई समाधीचे दर्शन घेतले.
close