भारतीय जनता पक्ष हा देशातील दोन सर्वात मोठ्या राजकीय पक्षांपैकी एक आहे. सध्या भारतीय जनता पक्ष हा सत्ताधारी पक्ष आहे, ज्याची केंद्राव्यतिरिक्त अनेक राज्यांमध्ये सरकारे आहेत. भारतीय जनता पक्षाची विचारधारा ही राष्ट्रीय स्वयंसेवक दल (RSS) पासून प्रेरित आहे. आरएसएस ही हिंदुत्ववादी संघटना आहे. जनसंघाची स्थापना २१ ऑक्टोबर १९५१ रोजी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी केली होती. १९७७ मध्ये जनसंघामध्ये आणखी अनेक पक्षांचे विलीनीकरण झाल्यानंतर त्याचे नाव जनता पक्ष असे ठेवण्यात आले. परंतु 1980 मध्ये जनता पक्षाचे विघटन झाल्यानंतर त्याची पुनर्रचना होऊन त्याचे नाव भारतीय जनता पक्ष (भाजप) ठेवण्यात आले. १९५१-५२ मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भारतीय जनसंघाने लोकसभेच्या तीन जागा जिंकल्या, त्यापैकी श्यामा प्रसाद मुखर्जी यांनीही एक जागा जिंकली. भाजपचे निवडणूक चिन्ह कमळाचे फूल आहे. २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले आणि भाजपने लोकसभेत २८२ खासदार जिंकले. तर २०१९ च्या निवडणूकित ३०३ खासदार जिंकत एक हाती सत्ता मिळवली. भारतीय जनता पक्ष (हिंदी: भारतीय जनता पार्टी) हा भारतातील एक राष्ट्रीय राजकीय पक्ष आहे. या पक्षाची विचारधारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत संलग्न असून त्याची धोरणे उजवीकडे झुकणारी आहेत असे मानले जाते. २०१४ सालापासून संसदेच्या लोकसभा सभागृहामध्ये भाजपचे बहुमत असून विद्यमान भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचे सदस्य आहेत.
१९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी ह्यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली. जनसंघ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग मानले जात असे. काँग्रेस व तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ह्यांच्याकडून पाकिस्तानचे होणारे लांगूलचालन रोखणे व भारतामधील हिंदूंचे हित जपणे ही जनसंघाची उद्दिष्टे होती. स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये संपूर्ण सामावून घेतला जावा अशी आग्रही भूमिका जनसंघाने घेतली व ह्यादरम्यान निदर्शने करताना अटक झालेल्या मुखर्जी ह्यांचे काश्मीरच्या तुरुंगातच निधन झाले.
दीनदयाल उपाध्याय व त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी ह्या तरुण नेत्यांनी जनसंघाची सूत्रे हातात घेतली. १९५२ सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनसंघाला केवळ ३ जागांवर विजय मिळाला.
१९६७ सालच्या देशव्यापी विधानसभा निवडणुकांमध्ये जनसंघाने अनेक लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती केली व मध्य प्रदेश, बिहार व उत्तर प्रदेश राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली. युतीचे राजकारण करण्यासाठी जनसंघाला आपली अनेक कट्टर हिंदूवादी धोरणे व विचार बदलणे भाग पडले. १९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला जनसंघाने कडाक्याचा विरोध केला व जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात डांबले गेले. १९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई इत्यादी नेते जनता पक्षाचे सदस्य होते. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व मोरारजी देसाई पंतप्रधान तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री बनले. परंतु अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले व जनता पार्टीचे विघटन झाले.वाजपेयी यांनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनसंघ यांतील मित्र, खासकरून लालकृष्ण अडवाणी आणि भैरोसिंग शेखावत यांच्यासोबत मिळून भारतीय जनता पक्षाची स्थापना १९८० साली केली. वाजपेयी हे भाजपाचे पहिले अध्यक्ष बनले. भाजप हा काँग्रेसचा प्रबळ विरोधक होता. ऑपरेशन ब्ल्यू-स्टारला भाजपाचा पाठिंबा असला तरी अंगरक्षकाकडून झालेल्या इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीमध्ये ज्या शीखविरोधी दंगली उसळल्या त्याचाही भाजपाने विरोध केला. यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या वाट्याला केवळ २ जागा आल्या. तरीही भाजपा देशाच्या राजकारणात मुख्य प्रवाहात राहिला आणि वाजपेयी हेच पक्षाच्या केंद्रस्थानी राहिले. तरी भाजपावरील हिंदुत्वाचा प्रभाव वाढत होता, त्यामुळेच रामजन्मभूमीच्या विश्व हिंदू परिषदेच्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रश्नाला भाजपाने राजकीय स्तरावर आवाज दिला. यात अयोध्येत राममंदिर बांधण्याचा मुद्दा समाविष्ट होता. ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत बाबरी मशीद नावाची वास्तु पाडण्याच्या घटनेमुळे देशात जातीय हिंसाचार उसळला.
तरीही देशाच्या राजकारणातला भाजपाचा विस्तार होतच राहिला. १९९५ च्या मार्चमध्ये गुजरातच्या आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांत भाजपाला विजय मिळाला. भाजपाच्या मुंबई येथील नोव्हेंबर १९९५ च्या अधिवेशनात अडवाणी यानी वाजपेयी याचे नाव १९९६ च्या लोकसभा निवडणुकांदरम्यान पंतप्रधान पदासाठी उमेदवार म्हणून घोषित केले.
अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले. भाजपचा चेहरामोहरा जनसंघासारखाच होता. या पक्षामध्ये 'अध्यक्ष' हा पक्षाचा प्रमुख असतो. याचा कार्यकाळ ३ वर्षांचा असतो. नुकत्याच झालेल्या दुरुस्तीनुसार या तीन वर्षांनंतर, अधिकची तीन वर्षे म्हणजे सलग ६ वर्षे अध्यक्षपदी राहता येऊ शकते.
भारतीय जनता पक्षाने मार्गदर्शक मंडळ नावाच्या ज्येष्ठांच्या परंतु एक्झिक्युटिव्ह अधिकार नसणाऱ्या विशेष सल्लागार मंडळाची उभारणी केली आहे.या मंडळातील सद्य सदस्य लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह
भाजपामध्ये 'नॅशनल काऊन्सिल' नावाची कार्यकारिणी आहे. हा पक्षातील विविध ज्येष्ठ व महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींचा मोठा गट आहे. यात सद्य अध्यक्षांसोबत सर्व माजी पक्षाध्यक्ष, सर्व राज्यांचे अध्यक्ष, पक्षाचे सर्व खासदार (लोकसभा व राज्यसभेतील), पक्षाचे सर्व आमदार (विधानसभा व परिषदांतील), राष्ट्रीय कार्यकारिणीतील सर्व सदस्य व सर्व संलग्न मोर्चा/विभागांचे अध्यक्ष यांचा समावेश होतो. या व्यतिरिक्त 'सेंट्रल इलेक्शन कमिशन' नावाच्या गटाकडे विविध प्रांतातील निवडणुकांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असते. या गटातही किती व कोणते सदस्य असावेत यावर संख्येचे बंधन नाही. तसेच राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्य या गटाचेही सदस्य असतातच. त्यांच्या व्यतिरिक्त सध्या या गटामध्ये जुरल ओरम, शाहनवाज हुसेन, विनय कटियार, जे.पी.नड्डा, डॉ. हर्षवर्धन, सरोज पांडे यांचा समावेश आहे.
पक्षांतर्गत तक्रारींच्या निवारणासाठी आणि पक्षाच्या सदस्यांवर तसेच ऑफिस बेअरर्सवर कारवाई करण्याचा अधिकार असणारी 'डिसिप्लिनरी कमिटी' हा ५ सदस्यांचा अजून एक स्वायत्त गट पक्षात आहे. सध्या या गटाचे अध्यक्ष श्री राधा मोहनसिंग आहेत. तर श्री जगदीश मुखी हे सेक्रेटरी आहेत.
विविध प्रश्नांवर विशेषत्वाने लक्ष देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ५० विभाग बनवले गेले आहेत त्यांना 'नॅशनल सेल्स' म्हटले जाते. यात पाणी प्रश्न, अंत्योदय योजनेपासून, मजदूर महासंघ, प्राकृतिक चिकित्सेपर्यंत अनेक विषयांना वाहिलेले विभाग आहेत
राष्ट्रीय अध्यक्ष:-
१९८०–८६ अटलबिहारी वाजपेयी,
१९८६–९१ लालकृष्ण अडवाणी, १९९१–९३ मुरली मनोहर जोशी, १९९३–९८ लालकृष्ण अडवाणी, १९९८–२००० कुशाभाऊ ठाकरे,
२०००–०१ बंगारू लक्ष्मण,
२००१–०२ जन कृष्णमूर्ती, २००२–०४व्यंकय्या नायडू, २००४–०६ लालकृष्ण अडवाणी, २००६–०९ राजनाथ सिंह, २००९–१३ नितीन गडकरी, २०१३–१४ राजनाथ सिंह,
२०१४– अमित शाह,
२० जानेवारी २०२० चालू जे.पी.नड्डा(जगत प्रकाश नड्डा)
*भाजपाने देशाला दोन पंतप्रधान दिले*
अटल बिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात काही महत्वपूर्ण निर्णय झाले. वाजपेयींनी अमेरिकेबरोबर मैत्रीसंबंध विकसित करण्यावर भर दिला. त्यांच्या कार्यकाळात अमेरिकेबरोबर व्यापार वाढला. द्विपक्षीय संबंध सुधारले. शेजारच्या चीन बरोबरही आर्थिक संबंध विकसित करण्यावर भर दिला. दोन्ही देशांमधला सीमावाद सोडवण्यासाठी चर्चा सुरु केली.
पाकिस्तान बरोबर संबंध सुधारण्याचे वाजपेयींनी विशेष प्रयत्न केले. दोन्ही देशांमधले संबंध सुधारण्यासाठी त्यांनी दिल्ली-लाहोर बससेवा सुरु करण्यासाठी पुढाकार घेतला. स्वत:हा त्या बसमध्ये बसून पाकिस्तानात गेले. वाजपेयी यांच्या परराष्ट्र धोरणातील तो एक महत्वपूर्ण उत्तम निर्णय होता. पण सवयीप्रमाणे पाकिस्तानने दगाबाजी केली. यशस्वी अण्वस्त्र चाचणी केली.
११ मे १९९८ हा दिवस आधुनिक भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्वाचा दिवस म्हणून गणला जातो. कारण याच दिवशी भारताने जगाला आम्हीही काही कमी नाही हे दाखवून दिले होते. राजस्थानच्या पोखरण रेंजमध्ये भारताने याच दिवशी यशस्वी अणू चाचण्या केल्या होत्या. भारताच्या या गुप्त मोहिमेमुळे अमेरिकाही चकित झाली होती. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा तो क्षण होता. तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अणू चाचणीच्या या धाडसी निर्णयामुळे संपूर्ण जग अवाक झाले होते.शिक्षण आणि आर्थिक धोरण
अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारने सर्व शिक्षा अभियानाची सुरुवात केली. ६ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांना शिक्षणाचा मुलभूत अधिकार मिळवून दिला. त्यांच्या कार्यकाळातच राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्पाची सुरुवात झाली आणि देशात उत्तम दर्जाचे महामार्ग बांधले गेले.
वाजपेयी सरकारने आणलेल्या नव्या दूरसंचार धोरणामुळे दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडली. वाजपेयी सत्तेवर असताना देशाची अर्थव्यवस्था उत्तम स्थितीमध्ये होती. जीडीपीचा दर हा आठ टक्क्यांच्या पुढे होता तर महागाई दर चार टक्क्यांपेक्षा कमी होता. भारताकडे परकीय चलन साठाही चांगल्या प्रमाणात होता.
कारगिल युद्ध - वाजपेयी पंतप्रधान असतानाच भारत आणि पाकिस्तानमध्ये कारगिल युद्ध झाले होते. पाकिस्तानी सैन्याने सीमा ओलांडून कारगिलमध्ये घुसखोरी केली होती. वाजेपयींना याविषयी समजताच त्यांनी भारतीय लष्कराला घुसखोरांना हुसकावून लावण्याचे आदेश दिले. भारतीय लष्कराने या युद्धात आपला सर्वोच्च पराक्रम दाखवत पाकिस्तानी घुसखोरांना पिटाळून लावत आपला भूभाग परत मिळवला. १९९९ सालच्या मे ते जुलै दरम्यान हे युद्ध लढले गेले.
दुसरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यामुळे आतंरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रगती आणि ह्या विचारात घेऊन आपल्या धोरणांनी देशाला जगात वेगळे स्थान निर्माण करण्याचे काम करणारे एकमेव पंतप्रधान म्हणून त्याचा गौरव होतोय. चीन,पाकिस्तान सारख्या शत्रूची नाकेबंदी करून देशाला जगाच्या नकाशात वेगळे स्थान निर्माण करून देणारे जागतिक नेते म्हणून त्याचा गौरव करण्यात आला
देशातील गरिबी हटाव, शेतकऱ्याना सन्मान म्हणून सहा हजार रुपये सरसकट देण्याचे काम भारत देशाचे इतिहासात प्रथमतः करणारे एकमेव नेते, काश्मीर बाबत असेलेले 370 कलम हटून अनागोदी बंद करून कश्मीरचा विकास करण्यासाठी मोठे पाऊल टाकले, NRC सारखा कायदा पास करून बांगलादेशी घुसखोरी रोखण्यासाठी कडक पाऊल उचलले, मुद्रालोण मार्फत कोट्यवधी लोकांचे परिवार स्वतःचे पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न यशस्वी केला, पंतप्रधान जीवनदायी योजना मार्फत कोट्यवधी गरीबाना मोफत आरोग्याच्या सुविधा, बचत गटांना प्राधान्य देऊन स्त्री सबलीकरण, सुकन्या योजना, स्त्री शिक्षण,जनधन योजनेतून गरिबीच्या बँक खात्यात थेट मदत, ते आधार कायदा मंजूर करून हजारो कोटी रुपयांचा शासकिय निधीचा भ्रष्टाचार थांबवला, गरिबांना मोफत गॅस,आत्मनिर्भर भारत योजनेत स्वदेशी मालाचा वापर, स्किल इंडिया मार्फत उद्योग निर्मिती, अशा योजना राबविल्या आहेत. राममंदिर उभारणी सुरु केले आहे. नवीन संसद भवन निर्माण कार्य केले आहे. दलित व आदिवासी महिला राष्ट्रपती केले.
भाजपा २०२४ च्या निवडणुकीच्या तयारीत असून तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान करण्याच्या तयारीत आहे.
लेखन:-
श्री. भाऊसाहेब वाकचौरे पाटील
जिल्हा संयोजक, भाजपा, सोशल मिडिया सेल, उत्तर नगर

