शौकतभाई शेख
श्रीरामपूर - कोरोना महामारीच्या कालखंडात अहमदनगर जिल्ह्यातील ज्या हॉस्पिटल व डॉक्टर यांनी समर्पित भावनेने वैद्यकीय सेवा देऊन अनेकांचे प्राण वाचवले, अशा जिल्ह्यातील तेरा हॉस्पिटल व पाच डॉक्टरांचा विशेष वैद्यकीय सेवेबद्दल रेड क्रॉस सोसायटी श्रीरामपूरतर्फे देवदूत पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.
सदरचा पुरस्कार सोहळा सोमवार दिनांक १० एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता येथील नवीन प्रशासकीय इमारत हॉल कॉलेज रोड श्रीरामपूर या ठिकाणी संपन्न होणार आहे. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून रमेश कुलकर्णी - सचिव रेड क्रॉस सोसायटी पुणे, प्रज्वल मिठावाला - सचिव रेड क्रॉस सोसायटी संभाजीनगर ( औरंगाबाद), मीनाताई जगधने- मॅनेजिंग कौन्सिल सदस्या रयत शिक्षण संस्था सातारा व चेअरमन रयत संकुल- श्रीरामपूर, प्रविण सिनारे- गटविकास अधिकारी श्रीरामपूर, डॉ.सुनील औंधकर -सचिव रेड क्रॉस नाशिक, राजेंद्र राठोड - खजिनदार रेड क्रॉस संभाजीनगर (औरंगाबाद) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
पुरस्कारार्थी मध्ये सिव्हील हॉस्पिटल-अहमदनगर, बूथ हॉस्पिटल-अहमदनगर, आनंद ऋषीजी हॉस्पिटल-अहमदनगर, साईबाबा हॉस्पिटल-शिर्डी, प्रवरा मेडिकल ट्रस्ट-लोणी तालुका राहता, आमदार निलेश लंके प्रतिष्ठान संचालित शरदचंद्रजी पवार कोविड सेंटर-भाळवणी तालुका पारनेर, डॉक्टर विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल विळदघाट-अहमदनगर, उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय- श्रीरामपूर, डॉक्टर आरोळे हॉस्पिटल-जामखेड, फेअरबँक जेम्स फ्रेंडशिप मेमोरियल हॉस्पिटल-वडाळा मिशन तालुका-नेवासा, संत लूक हॉस्पिटल-श्रीरामपूर, नगरपालिका दवाखाना- श्रीरामपूर, शिक्षक व शिक्षकेतर सेवकवृंद संचालित कोविड सेंटर- सुगाव तालुका अकोले आदी हॉस्पिटलसह हृदयरोग तज्ञ डॉ. दिलीप शिरसाठ, डॉ.विनायक मोरगे, डॉ.रवींद्र जगधणे, डॉ. रवींद्र कुटे, डॉ. मच्छिंद्र त्रिभुवन आदी मान्यवरांचा देवदूत पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
पुरस्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी रेड क्रॉस सोसायटी श्रीरामपूरचे पदाधिकारी व सर्व आजीव सभासद परिश्रम घेत आहेत.
वृत्तसंकलन: समता न्यूज नेटवर्क - श्रीरामपूर

