shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

उद्या वडापुरीत कै. छाया ब्रह्मदेव गवळी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर.

उद्या वडापुरीत कै. छाया ब्रह्मदेव गवळी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर.

गरीब वंचित रुग्णांसाठी गवळी परिवाराचा  सामाजिक उपक्रमाचे आयोजन.
इंदापूर प्रतिनिधी: वडापुरी येथील अध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या कै. छाया ब्रह्मदेव गवळी यांचे द्वितीय पुण्यस्मरण निमित्त रविवार दिनांक 2 एप्रिल 2023 रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत
शिवचरित्रकार ह.भ. प. अमोल महाराज सूळ यांची कीर्तन सेवा व मृदुंग वादन  मृदंगाचार्य ह. भ.
 प. चंद्रकांत महाराज पांचाळ यांची सेवा यावेळी होणार आहे तर गरजू गरीब रुग्णांसाठी  मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर (बुधराणी हॉस्पिटल) या आरोग्य शिबिराचे उद्घाटन सुप्रसिद्ध डॉक्टर एम. के. इनामदार अकलूज व माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी १२ वाजता संपन्न होणार आहे.  
 या कार्यक्रमाचे संयोजक म्हणून लोकसेवक गणपतराव आवटे फाउंडेशन इंदापूर, इंदापूर क्रिटी केअर हॉस्पिटल इंदापूर व श्रीनाथ भजनी मंडळ वडापुरी यांचे असून या कार्यक्रमाचे आयोजन समस्त गवळी परिवार वडापुरी यांच्या वतीने करण्यात आल्याची माहिती हरिदास गवळी यांनी दिली.
close