shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्वच्छ सर्वेक्षण २०२३ च्या स्पर्धेमध्ये आपले इंदापूर शहर देशांमध्ये अव्वल येण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे - मुख्याधिकारी रामराजे कापरे यांच्या आवहान.

स्वच्छ सर्वेक्षण २०२३ च्या स्पर्धेमध्ये आपले इंदापूर शहर देशांमध्ये अव्वल येण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे - मुख्याधिकारी रामराजे कापरे यांच्या आवहान.

इंदापूर शहरात महिलांचा स्वच्छतेमधील सहभाग व त्यांचे स्वच्छतेमधील नेतृत्व वृद्धिंगत करण्यासाठी "स्वछोत्सव" 2023 अभियान संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: केंद्रस्वच्छ सर्वेक्षण २०२३ च्या स्पर्धेमध्ये आपले इंदापूर शहर देशांमध्ये अव्वल येण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे शासनाद्वारे दिनांक ७ मार्च २०२३ ते दिनांक ३० मार्च २०२३ या कालावधीत महिलांचा स्वच्छतेमधील सहभाग व त्यांचे स्वच्छतेमधील नेतृत्व वृद्धिंगत करण्यासाठी "स्वछोत्सव" २०२३ अभियान राबविण्याबाबत निर्देश देण्यात आले होते त्यानुसार इंदापूर नगर परिषदेच्या वतीने  मुख्याधिकारी रामराजे कापरे  यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २९ मार्च २०२३ रोजी शहरातील महिला बचत गटातील महिला, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील तसेच सौ कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक पाच येथील विद्यार्थिनी, शिक्षिका शहरातील  सामाजिक महिला कार्यकर्त्या नगर परिषदेतील महिला अधिकारी कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील सर्व आठ प्रभागांमधून स्वछोत्सव-२०२३  अभियान फेरी  काढण्यात आली. 
या मोहिमेचा मुख्य उद्देश महिलांच्या स्वच्छतेमधील सहभागापासून ते महिलांच्या नेतृत्वाखालील स्वच्छतेमध्ये झालेले संक्रमण साजरे करणे हा होता. सदर उपस्थित फेरीमधील सर्व महिलांना कचरा विलगीकरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी समक्ष कचऱ्याचे विलगीकरन करून ओला कचरा, सुका कचरा, घातक कचरा व सॅनिटरी वेस्ट इत्यादी कचऱ्यांची माहिती देऊन कोणत्या वस्तू कोणत्या कचऱ्यामध्ये विलगी कृत कराव्या याचे प्रात्यक्षिक परिषदेच्या परिषदेच्या महिला अधिकारी कर्मचाऱ्यांनी करून दाखवले . आपले शहर स्वच्छ व सुंदर तसेच हरित करण्यासाठी  मुख्याधिकारी  .रामराजे कापरे  व यांनी फेरीच्या सांगता समारंभावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना सर्वांनी आपापल्या परिसरामध्ये स्वच्छता राखावी. परिसरामध्ये झाडे लावावी .कचरा उघड्यावर टाकू नये तसेच इतरांनाही टाकून देऊ नये याबाबत जनजागृती करावी. आपल्या घरातील कचरा विलगीकृत करून घंटागाडी मध्ये द्यावा यासंबंधी मार्गदर्शन करून केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२३ च्या स्पर्धेमध्ये आपले इंदापूर शहर देशांमध्ये अव्वल येण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे व आपल्या शहराचा नावलौकिक वाढवावा असे शेवटी अवाहन केले . 
यावेळी उपस्थित सर्वांनी स्वच्छतेबाबत शपथ घेतली. त्यावेळी इंदापूर नगर परिषदेच्या मा. नगराध्यक्ष अंकिता मुकुंद शहा, इंदापूर तालुका प्रशिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव   मुकुंदशेठ शहा,मा. उपनगराध्यक्ष अरविंद वाघ, मा. नगरसेवक शेखर पाटील, सामाजिक कार्यकर्ते तसेच नगर परिषदेचे सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
त्यानंतर उपस्थित सर्वांचे आभार मानून त्यांना चहापान व अल्पोपार करण्यात आला त्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
close