shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कुठल्याही सत्तेपेक्षा संघटनेची ताकद मोठी आहे - प्रदीप गारटकर





कुठल्याही सत्तेपेक्षा संघटनेची ताकद मोठी आहे - प्रदीप गारटकर 

राष्ट्रवादीचे अकरा आमदार निवडून आणण्यात  दादांचे मोलाचे योगदान - आमदार दत्तात्रय भरणे.

प्रदीप गारटकर यांच्या एकसष्ठी निमित्त एक हजार महिलांना मोफत साडी वाटप .


फोटो ओळ : इंदापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या एकसष्ठी सोहळ्यात मानपत्र देताना आमदार दत्तात्रय भरणे व मान्यवर

इंदापूर प्रतिनिधी : कुठल्याही सत्तेपेक्षा संघटनेची ताकद मोठी आहेअसे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदिप गारटकर यांनी केले. इंदापूर शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त नगरपालिका प्रांगणात एकसष्ठी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्काराला गारटकर उत्तर देत होते.


यावेळी माजी राज्यमंत्री व आमदार दत्तात्रय भरणे आमदार यशवंत माने, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, सोनाई परिवार प्रमुख दशरथ माने, हवेली तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष दिलीप वालेकर, पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे उपाध्यक्ष सुनिल चांदोरे आदींनी मनोगते व्यक्त केली.  यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, श्रीमंत ढोले, दत्तात्रय घोगरे, अभिजीत तांबिले, सरपंच प्रविण डोंगरे, युवक नेते दीपक जाधव, वसंतराव मालुंजकर व सर्व आजी माजी नगराध्यक्ष, नगरसेवक व राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना गारटकर म्हणाले, माझे वडील संर्घषातुन पुढे गेले. त्यानी राष्ट्र सेवा दलात काम केले. तर कै. शंकरराव पाटील यांचे ते राईटहॅड म्हणुन काम पाहत होते. तर संभाजीराव काकडे यांना त्यांनी गावोगावी फिरविले. प्रवाह विरूध्द काम केले. अन्याय विरूध्द संघर्ष म्हणुन पतित पावन संघटनेच्या माध्यमातुन १९८६ साली कामकाज सुरु केले. काँग्रेस नेत्याविरूध्द गावोगावी संघर्ष केला. समाजाची निस्वार्थ सेवा केली. तर कै. गुलाबराव ताठे यांच्या स्मृती प्रित्यर्थ पुण्यात पतित पावन संघटनेच्या माध्यमातुन विश्वविक्रमी ५५५५ बाटल्याचे रक्तसंकलन केले.

सामाजिक काम करताना अघटित घटना घडल्या, त्याचे शल्य मनाला अजुन टोचत आहे. आपण व्यक्तिगत नाराज नाही. मला जे भाग्य लाभले ते अन्य कोणाला लाभले नाही. रायगड जिल्हातील आंदोलनावेळी कार्यकर्ते दोन दिवस उपाशी होते. परंतु कोणीही तक्रार केली  नाही. आपण अवास्तव धार्मिक स्तोम माजवित नाही शरीर साक्षात परमेश्वर मानतो. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांत परमेश्वराचा अंश असतो. १९९७ साली आरोग्य शिबिर घेतले. त्यावेळी बारा हजार रुग्णांची तपासणी केली. 

भ्रष्ट काम केले असते तर आपण भाई किंवा दादा झालो असतो. संस्कार मुळे आपण सज्जानांची दादागिरी केली. आपला हा सत्कार आपला नसुन आपल्याला सहकार्य केलेल्या कार्यकर्त्यचा आहे. आपल्याला सर्व कार्यकर्त्याची व परिवाराची साथ यामुळेच आपण इथपर्यंत पोहचलो. संघटना या विषयावर आपण स्वतंत्र पुस्तक लिहणार आहे. कुठल्याही सत्तेपेक्षा संघटनेची ताकद मोठी आहे. तरूणपिढीने व्यसनाधिकडे जाऊ नये. गॅंग तयार न करता संघटना तयार करा. संघटना म्हणून एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी उपस्थित एक हजार महिलांना साडी चोळीचे वाटप सौ.अनुराधा प्रदीप गारटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहा सांस्कृतिक भवन येथे इंदापूर शहरातल्या नागरिकांना सुग्रास भोजनाचा आस्वाद देण्यात आला. यावेळी कात्रज डेअरी अध्यक्ष केशरताई पवार, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, प्रकाश म्हस्के, त्रिंबक मोकाशी, संतोष चाकणकर, जयदिप बारभाई, सोलापूर जिल्हा ब्राम्हण सेवा संघाचे अध्यक्ष प्रमोद गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, युवक अध्यक्ष शुभम निंबाळकर, उपाध्यक्ष नवनाथ रुपनवर, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सचिन सपकळ, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, श्रीधर बाब्रस, विठ्ठल ननवरे, बाळासाहेब व्यवहारे, राजेंद्र चौगुले, स्वप्निल राऊत ,अशोक मखरे, दादासाहेब सोनवणे,मुकबधिर शाळेचे मुख्याध्यापक डॉ. अमोल उन्हाळे, मतिमंद शाळेचे मुख्याध्यापक महेश देशपांडे शिवाजी शिळवणे, तुकाराम डुकरे आदी कर्मचारी व कार्यकर्त्यानी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
 
चौकट : राष्ट्रवादीचे अकरा आमदार निवडून आणण्यात  दादांचे मोलाचे योगदान 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्ह्यात आज जो बोलबाला दिसत आहे. त्यामागे प्रचंड कष्ट आहेत. विधानसभेच्छा निवडणूकीच्या काळात पुणे जिल्ह्यात वरिष्ठ नेत्यांच्या सोबत एक माणूस प्रचंड कष्ट घेत होता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष म्हणून प्रदीपदादा गारटकर यांनी अतिशय मोलाची कामगिरी बजावली म्हणूनच आज राष्ट्रवादीचे अकरा आमदार आपल्याला दिसत आहेत. अशा शब्दात गारटकर यांचा गौरव आमदार दत्तात्रय भरणे यांनी केला. 


close