समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने भव्य शोभा यात्रेचे आयोजन
प्रतिनिधी : सचिन गांधी
नगर : १ / प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने श्रीराम नवमी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शोभायात्रा ही दक्षिण मुखी हनुमान मंदिर वडारवाडी भिंगार या ठिकाणाहून सायंकाळी ६ वाजता सुरू झाली.
या शोभायात्रेचे हे ५ वे वर्ष होते . या शोभायात्रेमध्ये श्री चक्रधर स्वामी विद्यालय एमआयडीसी या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी झांज पथक व लेझीम पथकाद्वारे प्रभू श्री रामचंद्रांना मानवंदना दिली. या पथकाने सर्व भिंगारवासियांचे लक्ष वेधून घेतले होते. या विद्यार्थ्यांना विद्यालयाचे शिक्षक श्री आशिष शिराळे सर यांनी मार्गदर्शन केले होते.
प्रभू श्रीरामांचा जयघोष छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो हिंदू धर्माचा विजय असो हिंदु राष्ट्राचा विजय असो अशा प्रकारच्या घोषणा या शोभायात्रेमध्ये देण्यात आल्या.
यावर्षी उत्सव समितीच्या वतीने हिंदी हिंदू जनजागृती समिती प्रकाशित लव जिहाद विषयी जागृती पर पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
यावेळी भाजपाचे युवा नेतृत्व महेशजी झोडगे, युवा उद्योजक सचिनजी सुसे, कॅन्टोन्मेंट बोर्ड उपाध्यक्ष श्री वसंत जी राठोड, माजी नगरसेवक श्री रविभाऊ लालबंद्रे, इत्यादी मान्यवर उपस्थित होतो. श्रीराम नवमी उत्सव समिती २०२३ प्रमुख श्री सतीश ज्ञानेश्वर मोरे उर्फ नाना मोरे उपस्थित मान्यवरांना भगवा पंचा, गुलाब पुष्प व श्रीफळ, लव्ह जिहाद पुस्तिका देऊन सन्मानित केले. श्री अंकुश तरवडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. श्री सचिन पेंडुलकर यांनी मूर्ती देखावा सजावट यासाठी प्रयत्न केले. श्री विजय दिलीप नामदे यांनी ध्वनीक्षेपणाची सेवा पाहिली. श्री लोकेशजी मेहतानी यांनी प्रसादाचे आयोजन केले होते.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दिनेश काटकर, सागर फुलारी, अमोल तागडकर, ओमकार चौधरी, जितिन नायर, निरंजन नन्नवरे, अशोक मामा, अजित मामा इत्यादी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

