प्रतिनिधी : महेश चव्हाण
नगर : १ / एमआयडीसी पोलीस स्टेशन हददीत एमआयडीसी भागात एका टपरीवर काही महिला व इसम विनापरवाना देशी विदेशी, तसेच गावठी हातभट्टीची दारू चोरुन विक्री करत असताना एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकून मुद्देमाल जप्त केला आहे . एमआयडीसी पोलीस स्टेशन हददीत वेगवेगळया ठिकाणी छापे टाकुन पोलिसांनी ४२३६०/- रुपयाचा मुददेमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दि . .३० मार्च २०२३ रोजी सपोनि राजेंद्र सानप प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन अहमदनगर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , एमआयडीसी पोलीस स्टेशन हददीत एमआयडीसी भागात एका टपरीवर काही महिला व इसम विनापरवाना देशी विदेशी, तसेच गावठी हातभट्टीची दारुची चोरुन विक्री करत आहेत. त्यावरुन सपोनि राजेंद्र सानप यांनी वेगवेगळे पथके तयार करून एमआयडीसी पोलीस स्टेशन हददीत वेगवेगळया ठिकाणी छापे टाकुन ४२३६०/- रुपयाचा मुददेमाल जप्त केला आहे. त्यावरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला २०५ /२०२३ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे एकूण आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदरची कारवाई मा. श्री राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे साहेब अपर पोलीस अधीक्षक सो. अहमदनगर, श्री. अजित पाटील साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी सो. नगर ग्रामीण विभाग अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि राजेंद्र सानप प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन, पोसई राजेद्र गायकवाड, सफी रावसाहेब लोखंडे, पोना आंधळे, पोना पालवे, पोकों किशोर जाधव, पोकों प्रशांत धुमाळ, पोकों, नवनाथ दहिफळे यांचे पथकाने केली आहे.

