shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगच्या जिल्हाध्यक्षपदी तुषार महाजन यांची नियुक्ती


राज्यभरातून होतोय कौतुकांचा वर्षाव..!
 
नगर प्रतिनिधी :
देशपातळीवर काम करणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या साप्ताहिक विंगच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी पत्रकार तुषार संजय महाजन यांची निवड करण्यात आली आहे. व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनात विनोद बोरे यांनी ही निवड केली आहे.

 शिर्डी येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरण प्रेमी व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे तुषार महाजन यांच्या पत्रकारितेमधील उज्वल कारकीर्द आणि सक्रिय काम पाहून आम्ही आपली 'व्हॉईस ऑफ मीडिया' या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या साप्ताहिक विंगच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे असे प्रदेशाध्यक्ष विनोद बोरे म्हणाले.   

 यावेळी तुषार महाजन म्हणाले, व्हॉइस ऑफ मीडियाच्या द्वारे राज्यातील सर्व साप्ताहिकांचे संपादक, प्रतिनिधी अन् कर्मचारी एकत्रित येणार आहेत. साप्ताहिक विंगच्या माध्यमातून शासकिय जाहिरातींची रोस्टरप्रमाणे अंमलबजावणी करणे, अधिस्विकृतीधारक साप्ताहिक संपादकांना विश्रामगृहामध्ये आरक्षणाची अंमलबजावणी करणे, साप्ताहिकाच्या संपादक - पत्रकारांना पत्रकार परिषदेत आमंत्रित करणे, शंकरराव चव्हाण व पत्रकार कल्याण योजनांचा पत्रकारांना लाभ मिळावा, तसेच जिल्हा माहिती कार्यालयामधून ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनांची माहिती मिळावी आदी प्रश्न सोडविण्याचे काम केले जाणार आहे.

साप्ताहिक विंगची अहमदनगर जिल्हाची कार्यकारिणी लवकरच नियुक्ती तुषार महाजन करणार आहेत.त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे राज्यभरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
close