shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता महाराष्ट्र पुरस्कारासाठी डॉ.मोहसीन शेख यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

  
राहाता प्रतिनिधी -महाराष्ट्र राज्य शासनातर्फे प्रशासकीय सेवेत दिला जाणारा सर्वोत्तम बहुमानासाठी राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाने डॉ.मोहसीन शेख यांची निवड करण्यात आली आहे.

डॉ.शेख यानचेकडे सध्या राहाता महसुल मंडलाधिकारी म्हनुन पदावर शासन सेवेत जबाबदारी आहेत. त्यानी सदरील सेवेचा प्रभार सांभाळत महसुल प्रक्रियेत शासन निर्णय द्वारे क्यू आर कोड प्रक्रियेत गतिमानता निर्माण केल्याने शासनाने विशेष कौतुक करत महाराष्ट्र राज्यातील प्रथम पुरस्कार घेणारे एकमेव मंडळ अधिकारी ठरलेले आहेत.दि.21 एप्रिल 2023 रोजी नागरी सेवा दिना निमित्त राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ राव शिंदे यांचे हस्ते मुंबई येथील कार्यक्रमात पन्नास हजार रुपये,प्रमाणपत्र,सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला जाणार आहे.महसूल मडल अधिकारी,तलाठी,शासकीय अधिकारी,सामाजिक व राजकीय व शेख साहेब यांचेवर प्रेम करणारे राहाता ग्रामस्थांकडून शुभेच्छां देण्यात  येत असल्याने शेख साहेब यांनी सर्वाचे आभार व्यक्त केले आहे.
close