शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
शैक्षणिक बातमी
दि. १९ एप्रिल रोजी सिल्वर ऑक अकॅडेमी येथे विद्यार्थी मंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शिर्डीचे पोलीस निरीक्षक श्री. नंदकुमार दुधाळ यांनी भूषवले.
विद्यार्थ्यांना लोकशाही शासन पद्धती व निवडणूक प्रक्रिया यांची माहिती व्हावी, या उद्देशाने दरवर्षी शाळेत प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया आयोजित केली जाते. त्यानुसार सर्वप्रथम निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यात आले. विद्यार्थ्यांनी हस्तलिखिते, विविध चित्रे यांच्या माध्यमातून स्वतासाठी प्रचार केला. दि. १५ एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले. पालक शिक्षक संघातील पालक प्रतिनिधींनी मतमोजणीची जबाबदारी स्वीकारली होती.
या निवडणुकीत विजयी उमेदवारांना शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. मोहिनी जगताप यांनी शपथ दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शिर्डीचे पोलीस निरीक्षक श्री. नंदकुमार दुधाळ यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच विध्यार्थ्यांना मोबिले चा वापर कमी करून जास्तीत जास्त मैदानी खेळ खेळण्याचा सल्ला दिला. "कष्ट व जिद्द याच्या जोरावर मनुष्य कठीणात कठीण उद्देश्य प्राप्त करू शकतो. अभ्यासा सोबतच विद्यार्थ्यांनी कला, क्रीडा या विश्यान्माद्येदेखील रस घ्यायला हवा." असे मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. सिल्वर ओक अकॅडेमी मध्ये होत असलेल्या नवनवीन उपक्रमांची त्यांनी माहिती घेतली.
यावेळी कु. सबुरी हारळे ( हेड गर्ल), चि. आदित्य गोंदकर (हेड बॉय), चि. वेदांत कोते (स्पोर्ट्स कॅप्टन), कु. कस्तुरी कोल्हे ( डिसिप्लीन हेड), कु. सायली सजन (कल्चरल हेड), कु. सायली तुरकने ( पी.आर.डब्लू.आर.) इत्यादी विद्यार्थी प्रतिनिधींनी पदाची शपथ घेतली.
यावेळी सिल्वर ऑक अकॅडमीचे विश्वस्थ श्री जितेंद्र शेळके, श्री. विलासराव शेळके, श्री. महेंद्र शेळके, श्रीमती अलकाताई शेळके, श्रीमती अनुराधा शेळके तसेच पालक शिक्षक संघाचे पालक प्रतिनिधी उपस्थित होते. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

