रमजानुल मुबारक -२०२३
मंगळवार ता.१८--०४-२०२३ - रोजा २६
"इस्लाम समजून घेताना"
लेखन -डॉ. सलीम सिकंदर शेख
बैतुशशिफा हॉस्पिटल श्रीरामपूर
----------------------------------------
*"आज एक -एक लम्हां- लम्हां
*(क्षण) का वाया घालवायचा ?"
दिव्य कुरआन मधे (१) "आम्ही (अल - कुरआन ) ला कद्र च्या रात्रीत अवतरीत केले आहे, (२), आणि तुम्हाला काय माहीत की " कद्र" ची रात्र काय आहे ?, (३ ), कद्र ची रात्र हजार महीन्यांपेक्षाही अधिक उत्तम आहे, (४ ) ,दुत (ईशदुत) आणि रुह (जिब्राईल अलै.) त्यात आपल्या पालनकर्त्याच्या आज्ञेने प्रत्येक आदेश घेऊन उतरतात (५) ,लैलतुल कद्र ची रात्र पुर्णतः "शांती"आहे,उषःकालापर्यंत (दिव्य कुरआन - पारा ३० सुरह नं.९७ आ.नं.१ ते ५),
हजरत ईबने अब्बास म्हणतात प्रेषित मुहम्मद स्व. सल्लम यांनी सांगितले," लैलातुल कद्र ची रात्र रमजान महीन्याच्या अंतिम चरणात येते, अंतिम दहांपैकी , २१ वी , २३ वी, २५ वी , २७ वी , २९ वी या पाच रात्री येतात.(सहीह बुखारी २०२२),
हजरत आयेशा रजि. (प्रेषित मुहम्मद स्व.सल्लम यांच्या पत्नी) सांगतात की," रमजानच्या अंतिम दहा रात्री जेंव्हा येत असत, त्यावेळेस आम्हाला प्रेषित स्व. स्वतः स्वच्छ ड्रेस परिधान करून त्यांच्या बरोबर घरातील मंडळींना तीलावत - प्रार्थना करण्यासाठी संपूर्ण रात्रभर जागवीत असत" (सहीह बुखारी २०२४)., या प्रत्येक लैलतुल -कद्र ची रात्रं रोजच्या दैनंदिन रात्रींपेक्षाही (१०००) एक हजार महीन्यांपेक्षाही अधिक महिन्यांच्या रात्रींपेक्षा जास्त महत्त्वाची सबाब (पुण्यवान) कमावण्याची असते.
दिव्य कुरआन म्हणते की, "आम्ही या रात्र मध्ये दिव्य कुराण ग्रंथ पृथ्वीवर तुमच्या मार्गदर्शनासाठी अवतरीत केला आहे," आणि तुम्हाला काय माहीत की ही रात्र काय असते", "तुम्ही कधी या रात्रीचे महत्त्व जाणले तर तुम्ही स्तब्द व्हाल व तुम्हाला भान राहणार नाही," (सुरह नं.९७ आ.नं.१-ते - ५), या लैलतुल -कद्र च्या रात्रींचं महत्त्व आहे,
अशाच प्रकारे संपूर्ण वर्षभर (१) ईदु आजहा (बकरी ईद) रात्र., (२) ईदुल फितत्र (रमजान ईद) रात्र, (३) मोहरमची आशुरा १० वी रात्रींचे महत्वही काही औरच सांगितले आहे.यांमध्ये कोणती रात्र महत्त्वाची आहे हे तज्ञांमध्ये मतमतांतरे आहेत,कारण अल्लाह (ईश्वरा) ने या दिव्य लैलतुल -कद्र च्या रात्रींचं गुपित आपल्या स्वतःच्याकडे ठेवलं आहे. कुरआन म्हणते की ,"जे समोर आहे आणि जे काही गुपित आहे या सर्वांचे ज्ञान फक्त (ईश्वर), अल्लाहकडेच आहेत व आपल्या ज्ञानाच्या मर्यादा फक्त तो पर्यंत मर्यादित आहे , जे (ईश्वराने) अल्लाहाने माणसाला प्रदान केलेले आहेत किंवा देवु इच्छितो. या रात्रीचे ज्ञान फक्त आल्लाहाने (ईश्वराने) आपल्या जवळ ठेवले आहेत"काही तज्ञांनी आपल्या ज्ञानाच्या कुवतीनुसार फक्त
उदाहरणार्थ :- जर लैलतुल-कद्र च्या एका रात्रीत आपण एक शब्दहीही नमन - चिंतन - क्षमा - माफी मागितली. (असतगफीरुल्लाह ) मगफिरत निष्कलंक चारित्र्य होण्यासाठी याचना दुआ केली, तर गणिती भाषेत किती सबाब -पुण्यांत रुपांतर होते त्यानुसार बेरीज केली आहे,वाचायला हरकत नसावी.एक रात्र लैलतुल कद्र ची किंवा एक हजार (१०००) महीन्यांच्या दिवसानुसार फक्त एका रात्रीत किती -सेकंद ,किती - मिनिटे, किती -तास ,किती -दिवस, किती- वर्षांची ईबादत, बंदगी होते,त्यांची गोळा बेरीज केली.एक १ सेकंद = २३ तास ईबादत,१ एक मिनिट = ५८ दिवसांची ईबादत, एक तास = ९ -८ वर्षे ईबादत, शेवटी एक रात्र = ८३ वर्षे (त्रेयांशी वर्षे) इयर्स , ईबादत,बंदगी (पुजा) होते,एवढी मोठी महत्वाची लैलतुल -कद्र च्या फक्त एका रात्रींचं सबाब (पुन्य) फक्त एकट्या एका रात्रीचं महत्व, अगर एवढे सारं काही एका रात्रीत भेटत असेल तर मग एक एक सेकंद- एक एक मिनिट का वाया घालवायचं ?
प्रेषित मुहम्मद स्व. यांनी सांगितले की, ''लैलतुल-कद्र 'च्या रात्री आल्लाह शेवटच्या सातव्या आकाशावर येऊन पृथ्वीतलावर येऊन प्राणीमात्रांना व माणसांना आव्हान करतात की ,, "(१) कोण आहे जे माझ्याकडे दयेची याचना करतोय की मी त्याला दया ,देईल, दाखवील," (२) कोण आहे ,जो करूणेची भिख मागेल मी त्याला करूणेची भिक देईल","(३)" कोण आहे ,जो कळतनकळत आपल्या हातुन झालेल्या लहान-मोठ्या चुका- पापांची क्षमा याचना मागतोय,की मी त्याला क्षमा देईल " " (४)" कोण आहे ,जो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून माझ्याकडे मागणं मागतो, मी त्या सर्व मनोकामना पूर्ण करील"." सर्वांना मनोभावे माफी देईल",(५), "पुन्हा प्रेषित मुहम्मद स्व. म्हणतात की," या लैलतुल-कद्र च्या रात्री आल्लाहा दोन्ही हात मोकळे करून मानव जातीस अव्हान करतात की, कोण आहेत जो एक आशा आल्लाहाला कर्ज देईल की,जो दरिद्री नाही व अत्याचारी तर नाहींच ?, अल्लाह चे ( ईश्वरा) हे सकाळी भोर पहाटेपर्यंत आव्हान हे , -क्षमा- दया - करुणा - बक्षिसे, देण्याचे काम चालूच असते,
पण मानवजातीला त्या आव्हानांची फिकीर नसते, आपण मस्तावलेले, सुस्तावलेले झालेलो असतो,विचार करण्याची मानसिकताच नसते.खरोखरच फार विचार करण्यासारखे आहेत की,अल्लाहला काय गरज कर्जाची ?,जशी आपली आई जेव्हा स्वतःच्या मुलांकडून काही छोटीशी अपेक्षा करते व मुलांना याचना करते की मला काहीतरी दे,अगदी त्याचप्रमाणे अल्लाह देखील आपल्याला आपल्या आईप्रमाणे जाणून-बुजून आपल्याला कर्ज मागतात,पण कशासाठी ? तर - गरीब - अनाथ - विधवा - खुप शहरांमध्ये , खेड्यांत उपाशीपोटी असलेल्या भुकेले खुप आहेत, यां सर्वांची काळजी अल्लाहला कायमच राहते यासाठी"आपण म्हणतो की अल्लाह भुका उठाता है ; लेकीन भुका खालीपेट सुलाता नहीं"
खरं तर ते आपली परीक्षा घेत असतात,त्यांना काय घेणं, परंतु आल्लाह कृपावंत,दया देणारे, कायम आपल्याला काहीतरी देतच असतात,आपल्या इच्छांची पूर्तता करतच असतात. संपूर्ण मानवजात - प्राणिमात्र - जीवजंतू हे अल्लाहनेच निर्माण केलेले सर्व जगात, जगाने कितीही मागितले.
तरी त्यांच्या अथांग महासागरात समजा ऐक सुईच्या टोकाला जेवढे थैंब येतील तेवढे कणभरही कमी होणार नाहीत. बिलकुलच नाही,येवढी लिला एकठ्या अल्लाह (ईश्वरा) ची आहेत.ते कृपावंत,दयावंत सृष्टीचा स्वामी,तारणहार सर्वकाही देणारा अल्लाह (ईश्वर) च आहे.
परमेश्वर आपल्याला जेवढे योग्य, कुवती व सहनशक्ती प्रमाणेच देतात.अल्लाह परमदयाळू, कृपावंत आहे ते अत्याचारी तर ते नाहीतच नाही.प्रेषित मुहम्मद स्व. सल्लम यांच्या पत्नी हजरत आयेशा रजि.म्हणतात की," आपण केलेल्या सर्वप्रथम चुका व पापाची क्षमा मागा.
कारण आपल्यासाठी तेच महत्त्वाचे आहेत",आज संधी आहे, अजुनही वेळ गेलेली नाही,उचला फायदा.......!
डॉ.सलीम शेख - मो. ९२७१६४००१४

