shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शाहु फूले आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचारमंच च्या तालुकाध्यक्ष पदी सुदाम ढेमरे यांची निवड


प्रतिनिधी : संजय वायकर

नगर : १८ /  शाहु फूले आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचारमंच महाराष्ट्र राज्य अहमदनगरचे संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री .सुदाम साहेबराव ढेमरे यांची नगर तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. 

या निवडी बद्दल सुदाम ढेमरे यांचा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री .गणेश ढोबळे यांच्या हस्ते सत्कार व सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम मंगळवार दि . १८ एप्रिल रोजी
तपोवन रोड येथील शिव मार्बल या फर्म मध्ये पार पडला .

या प्रसंगी सुदाम ढेमरे यांनी निवडी बददल सर्वांचे आभार व्यक्त केले आणि पुढील काळात या विचार मंच च्या माध्यमातुन विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा मनोदय व्यक्त केला .

 याप्रसंगी गणेश ढोबळे यांनी सांगितले की, या संघटनेच्या माध्यमातून विविध शासकिय योजना तळागाळातील गरजु व्यक्तीं पर्यंत पोहचविणार आहोत गोर गरिब जनतेला मदतीचा हात देणार असून विविध सामाजिक कार्यातुन या संघटनेच्या छोट्याशा रोपट्याला भविष्यात मोठा वटवृक्ष बनविणार आहोत.

यावेळी नगर शहराध्यक्ष युनुस पठाण , बांधकाम व्यावसायिक प्रदिप जोशी , बिल्डर ज्ञानेश्वर घोडके,  शिव मार्बल चे मालक राहुल ढेमरे , दत्ता ढेमरे ,सामाजिक कार्यकर्ते अनिल ढवण , 
 सामाजिक कार्यकर्ते धीरज ढोबळे ,तसेच अनिश पठाण , शंकर काळे, अनिल कोकरे , संजय गायकवाड , विकास रिकामे , भारत कोकरे  ,नितीन लहारे , प्रतिक साबळे , मारुती सायंबर , प्रेम प्रजापति , अमोल ढेमरे , बाळासाहेब सांगळे , संभा ढेमरे , सिध्देश्वर सरोदे आदि मान्यवर उपस्थित होते .
close