shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे श्री स्वामी समर्थ केंद्र पिंपळनेर येथे आयोजन

सामोडे - (श्री दिलीप घरटे प्रतिनिधी)

श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त पिंपळनेर येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्म व बाल संस्कार केंद्रात प.पुज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या कृपाशीर्वादाने अखंड नाम, जप, यज्ञ, सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक १२ एप्रिल पासून सप्ताह सुरू होणार असून दिनांक १८ एप्रिल रोजी सत्यदत्त पुजनाने सप्ताह ची सांगता होणार आहे.
   सप्ताह कालात रोज सकाळी ८ वाटेच्या भुपाळी आरती नंतर सामुदायिक गुरुचरित्र ग्रंथाचे ८:३० ते १०:३० पर्यंत वाचन होणार आहे.
   ठिक १०:३० च्या नैवद्य आरती नंतर रोज गणेश याग, स्वामी याग,चंडीयाग,रुद्रयाग गीतायाग या प्रमाणे ज्या दिवशी जो याग असेल तो होणार आहे.
    अखंड नाम,जप, यज्ञ, सप्ताह असल्याने महिला सेवेकरी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत तर पुरुष सेवेकरी रात्री ८ ते सकाळी ८ पर्यंत प्रहर सेवा करणार आहेत.
     या अखंड नाम, जप, यज्ञ सप्ताह मध्ये सहभागी होऊ इच्छीणाऱ्या सेवेकऱ्यांना कोणत्या सेवेत सहभाग नोंदवायचा असेल त्यांनी प्रहर सेवेसह इतर सेवेत सहभागी होण्यासाठी श्री स्वामी समर्थ अध्यात्म व बाल संस्कार केंद्र पिंपळनेर येथे नाव नोंदणी करावी.असे आवहान श्री स्वामी समर्थ अध्यात्म बाल संस्कार केंद्र पिंपळनेर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
close