आंबेडकर जयंती निमित्त चोख बंदोबस्त करावा - सनी भैय्या खरारे
प्रतिनिधी : सुनिल ससाणे
नगर : १३ / विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शुक्रवार दि . १४ एप्रिल रोजी भिंगार शहर येथे काढण्यात येणाऱ्या शोभायात्रा मध्ये सी.सी.टीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे व मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त देण्यात यावा यासाठी अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेचे वतीने पोलिस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने अहमदनगर पोलीस अधीक्षक व भिंगार कॅम्प पोलीस निरीक्षक यांना निवेदन द्वारे मागणी करण्यात आले की दिं.१४ एप्रिल २०२३ शुक्रवार रोजी होणाऱ्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती संपूर्ण देशामध्ये मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येते.तसेच सालाबादप्रमाणे भिंगार शहरामध्ये मोठ्या उत्साह, आनंदाने व जल्लोषानीं साजरी करण्यात येते.भिंगार शहरामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची शोभायात्रा मोठ्या प्रमाणात काढण्यात येते.सदर यात्रेमध्ये महिला,ज्येष्ठ नागरिक,लहान मुले,सर्व सामान्य नागरिक आपल्या कुटुंबासहित मोठ्या संख्येने बाबासाहेबांना आदरांजली वाहण्याकरीता एकत्रित सहभागी होत असतात.परंतु मागच्या वर्षी १४ एप्रिल २०२२ महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मध्ये काही समाजकंटकांनी या सुवर्णक्षणी धुडगूस घालून महिलांची छेड काढणे,दगड फेक करणे,मिरवणूक मध्ये घुसून दोन समाजात तेढ निर्माण होईल अश्या घोषणाबाजी करून जयंती मध्ये गालबोट लावण्याचे प्रयत्न केले होते.
सध्या नगर शहरामध्ये प्रत्येक धार्मिक कार्यक्रम व मिरवणूक मध्ये अनुचित प्रकार घडत आहे.या परिस्थिती कडे पोलीस प्रशासनाने पूर्णपणे विचार करून.येणाऱ्या १४ एप्रिल शुक्रवार रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शोभायात्रा मध्ये कोणत्याही प्रकारची घटना घडू नये.दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या अश्या प्रकारच्या समाजकंटावर पोलिस प्रशासनांची करडी नजर ठेवण्या करीता व जयंतीच्या शोभायात्रा मध्ये कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये तसेच शहराचा वातावरण बिघडू नये.या सर्व गोष्टींचा विचार करून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भिंगार शहरात काढण्यात येणाऱ्या शोभायात्राचे मार्गात सी.सी.टिव्ही कॅमेरे बसविण्यात यावे व मोठ्या प्रमाणात पोलिस मनुष्यबळ देण्यात यावा.
निवेदन देताना अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनीभैय्या खरारे,जिल्हा उपाध्यक्ष राहुल लखन,वाल्मिकी समाज राष्ट्रीय अध्यक्ष तालेवार गोहेर, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पाटोळे,विकास पंडित,संजय खरे, दिलीप सूर्यवंशी,धिरज बैद,पवन सेवक आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

