shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दातरंगे मळा येथील सिमेंट काँक्रेट रोडचा लोकार्पण सोहळा संपन्न ...


सर्वांच्या सहकार्यानेच विकास साध्य होईल - गणेश कवडे

प्रतिनिधी : संजय वायकर

नगर : १३ /  महापौर रोहिणीताई सजंय शेंडगे यांच्या विकास निधीतुन व ,महिला व बालकल्याण समिती सभापती सौ पुष्पाताई अनिल बोरूडे,नगरसेवक शामभाऊ नळकांडे, नगरसेवक सचिन भाऊ शिंदे याच्या प्रयत्नातुन
प्रभाग क्रं 8 मधील दातरंगे मळा येथील पुर्ण झालेल्या सिमेंट कॉक्रेंट रोडचा लोकार्पण सोहळा पार पडला .

यावेळी महापौर रोहिणी ताई शेंडगे यांनी सांगितले कि , प्रभागातील विकास कामांना आम्ही प्रामुख्याने प्राधान्य देत आहोत. येथील फक्त पाण्याचा प्रश्न आता ऐरणीवर आहे तो ही आम्ही लवकर सोडवून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करू .

सभापती गणेश कवडे यांनी सांगितले की प्रभाग क्र . ८ मधील सर्व आवश्यक सुविधा आम्ही पूर्ण करत आहोत. तसेच सर्वांचे सहकार्य असेच मिळाल्यास पुढेही आम्ही महा विकास साध्य करू . विकास कामांना गती देऊन नागरिकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यास आम्ही कटिबद्द आहोत.

 याप्रसंगी महापौर रोहिणीताई सजंय शेंडगे, स्थायी समिती सभापती गणेशजी कवडे, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ पुष्पाताई अनिल बोरूडे, मा विरोधी पक्षनेते सजंयजी शेंडगे, मा उपमहापौर अनिल वसंतराव बोरूडे, नगरसेवक शामभाऊ नळकांडे,नगरसेवक सचिनभाऊ शिंदे व परिसरातील महिला व नागरिक उपस्थित होते
close