शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन) सामाजिक बातमी
शिर्डी येथील रुग्ण श्री कमलेश तारडे यांना बऱ्याच दिवसापासून किडनी चा त्रास होता त्यांच्या वर तातडीची शश्रयक्रिया करून त्यांची किडनी बदलणे गरजेचे होते खासदार श्री सदाशिव लोखंडे व आमदार श्री सुहास जी कांदे यांनी सदरील रुग्णाची दखल घेवून मुख्यमंत्री सहाय्यता निधी उत्तर नगर जिल्हा प्रमुख यांनी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांचे कडे पाठपुरावा करून मंत्रालय मधील वैद्यकीय मदत कक्षांचे प्रमुख श्री मंगेश चिवटे यांनी तत्काल सदरील रुग्णास मुख्यमंत्री सहाय ता निधी मधून रु २ लक्ष इतकी रक्कम नाशिक येथील अशोका हॉस्पिटल ला वर्ग करण्यात आली
सदरील रक्कम मिळण्यासाठी वैद्यकीय मदत कक्षांचे राज्य प्रमुख श्री राम राऊत,शिवसेना जिल्हा प्रमुख श्री जितेंद्र जाधव,शिवसेना जिल्हा प्रमुख श्री कमलाकर कोते यांनी सहकार्य केले . सदरील रुग्णाची परिस्थिति अत्यंत हलाखीची असून सदरील रुग्णाला किडनी प्रत्यारोपण करणेसाठी एकूण ९ लाख रु खर्च येणार आहे त्यापैकी २ लक्ष इतकी रक्कम मुखमंत्री सहायता निधी मधून मिळालेली आहे तरी अजून ७ लक्ष इतकी रक्कम सदरील रुग्णस खर्च येणार आहे तरी समाजातील दानशूर व्यक्ति यांनी पुढे येवून श्री कमलेश तारडे यांना किडनी प्रत्यारोपण करणे साठी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन श्री कमलाकर कोते यांनी केले आहे.
सदरिल रुग्णास मद्त करण्यासाठी संपर्क श्री नीलेश तारडे 8956060895 यांना संपर्क करावा.

