आडसूळ तंत्रनिकेतनमध्ये माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न.
प्रतिनिधी : संजय वायकर
नगर : ३ / अहमदनगर तालुक्यातील चास चेथील सौ. सुंदराबाई माणिक आडसूळ तंत्रनिकेतनद्वारे आयोजित केलेला माजी विद्यार्थी मेळावा पाचशे हून अधिक विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शनिवारी उत्साहात पार पडला. प्राचार्य, विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि माजी विद्यार्थी यांनी गतकाळात एकत्र घालवलेल्या मौल्यवान व संस्मरणीय क्षणांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आडसूळ तंत्रानिकेतन मार्फत माजी विद्यार्थ्यांची वार्षिक बैठक आयोजित करण्यात आली होती.
या मेळाव्याचे प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे आजी-माजी विद्यार्थ्यांमध्ये सुसंवाद साधला जावा व माजी विद्यार्थ्यांचे अनुभव आजी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनाचा दीपस्तंभ ठरावेत त्याचबरोबर तंत्रनिकेतन व माजी विद्यार्थी यांच्यामध्ये दृढ असा ऋणानुबंध निर्माण व्हावा यासाठी करण्यात आलेले होते. संस्थेचे अध्यक्ष मा श्री अनिरुद्ध माणिक आडसूळ यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषवले. माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष किरण जाधव या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी होते.
संस्थचे उपाध्यक्ष मा. श्री. विश्वनाथ माणिक आडसूळ. अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. पी.एम.पाटील यांनीही यावेळी उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व आणि त्यानंतर दीपप्रज्वलनाने झाली. उपस्थित सन्माननीय पाहुण्यांना रोपटे देऊन सन्मानीत करण्यात आले.
तंत्रनिकेतनचे प्राचार्य आपल्या स्वागतपर भाषणात बोलताना म्हणाले की तंत्रनिकेतन चे माजी विद्यार्थी आज उच्च पदस्थ अधिकारी, व्यावसायिक व उद्योजक बनलेले आहेत परंतु या मागे जशी तंत्रनिकेतनची शिक्षण पद्धती व विद्यार्थ्यांचे विद्यार्जन हे घटक जसे महत्वाचे आहेत तसेच शिक्षक, विद्यार्थी व पालक हा त्रिकोणही महत्त्वाचा घटक असून तिन्ही घटकांमधला पारदर्शीपणा व सुसंवाद यामुळेच विद्यार्थी यशस्वी झाल्याचे सांगून हेच विद्यार्थी आता सध्या तंत्रनिकेतन मध्ये शिक्षण घेत असलेल्या व येणाऱ्या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरणार आहेत. या तंत्रनिकेतनचे माजी विद्यार्थी हे नेहमीच तंत्रनिकेतन साठी सहकार्याची भूमिका घेत विविध मार्गाने तंत्रनिकेतन चे हित जपण्याचे काम करत आलेले आहेत आणि याही पुढे करत राहतील असे प्रतिपादन मेळाव्यात बोलताना तंत्रनिकेतनचे प्राचार्य गडाख आर.एस. यांनी केले.
त्यानंतर विद्यार्थी दशेत घडलेल्या गंमती जंमती आणि काही कटू गोड आठवणींना उजाळा देत माजी विद्यार्थ्यानी त्यांचे अनुभव व्यक्त केले. अथर्व जोशी, योगेश मांढरे,पूनम नागापल्ली, ऋषिकेश शिरसाठ, शुभम गायकवाड,अमित दरेकर यांनी त्यांच्या शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात काम करताना आलेल्या विविध अनुभवांना व आठवणींनी कथन केल्या. यापैकीच काही माजी विद्यार्थ्यांनी सध्याच्या व भावी विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प भेट, तज्ञांची व्याख्याने, सी. एस.आर. फंडातून मदत, अद्ययावत तंत्रज्ञानाबद्दल आजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन अशा माध्यमातून शक्य तितकी तंत्रनिकेतनला मदत करण्याचे आश्वासन देऊन संस्थेच्या वाढ आणि विकासामध्ये योगदान देण्याची प्रतिज्ञा केली.
माजी विद्यार्थी संघटनेचेअध्यक्ष किरण जाधव यांनी माजी विद्यार्थ्यांना संबोधित करताना आडसूळ तंत्रानिकेतनचे अभिनंदन केले की, या तंत्रनिकेतनने कर्तुत्ववान विद्यार्थी घडवून त्यांच्याबरोबरचा ऋणानुबंध कायम ठेवल्यामुळे आम्ही माजी विद्यार्थी भारावून गेलेलो आहोत. आमच्या जडणघडणीमध्ये तंत्रनिकेतचे प्राचार्य व सर्व शिक्षकांचा मोलाचा वाटा असून सर्व माजी विद्यार्थी तंत्रानिकेतनच्या विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी नक्कीच ठरतील अशी भावना व्यक्त करत भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी आडसूळ तंत्रनिकेतनला शुभेच्छा दिल्या.
सदर मेळाव्यामध्ये सर्व माजी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. पी. एम. पाटील यांनी मेळाव्यास माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत एकमेकास सहाय्य करा असे मोलाचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. अनिरुद्ध माणिक आडसूळ यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांना त्याच्या भावी आयुष्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन आयुष्याच्या वाटेवर आडसुळ तंत्रानिकेतन नेहमी त्यांच्या सोबत असल्याची ग्वाही दिली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सुमधुर भोजनाचा आस्वाद घेत माजी विद्यार्थ्यांनी एकमेकांशी संवाद साधला.
माझी विद्यार्थी मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रा.लोंढे पी.जी., प्रा. पावळे एस. एस., प्रा. अंबाडे एस आर, प्रा. गिरी डी. वाय., प्रा. आहेर एस के, यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्थापत्य अभियांत्रिकीच्या विभागप्रमुख प्रा.आकांक्षा म्हस्के यांनी केले विद्यार्थिनी प्रतीक्षा चोरमागे हिने उपस्थित यांचे आभार मानले.

